चालका अभावी नारिवली प्राथमिक आरोग्य केंद्राची गाडी सडते भंगारात ! *आरोग्य विभाग अनभिज्ञ *
मुरबाड, {मंगल डोंगरे} : तालुक्यातील नागरिकांना तातडीने आरोग्य सुविधा मिळावी म्हणुन कल्याण शहरातील आजदे येथील आरोग्य केंद्र नारिवली येथे स्थलांतरित केले असले तरी ते आरोग्य केंद्र नेहमी बंद असुन तेथे असणारे वाहन हे चालका अभावी बंद असुन ते भंगारात सडत असल्याने नागरिकामध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मुरबाड तालुक्यातील नारिवली या गावाला कोणताही ऐतिहासिक वारसा नसताना जिल्हा नियोजन समितीने या गावाला पर्यटन विकासाचा दर्जा देऊन त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयची विकास कामे होत आहेत. असे असताना या गावचे परिसरात असणाऱ्या वाड्या पाड्यातील नागरिकांना व येथे येणाऱ्या पर्यटकांना तातडीने आरोग्य सुविधा मिळावी म्हणुन ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कल्याण शहरातील आजदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुरबाड तालुक्यातील नारिवली येथे स्थलांतरित केले असले तरी या आरोग्य केंद्रात डॉक्टर तसेच इतर कर्मचारी हे नियमित येत नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असुन त्या आरोग्य केंद्रात रुग्णांची तसेच गर्भवती महीलांची वाहतुक करण्यासाठी असणारे वाहन हे सुस्थितीत असुन ते केवळ चालक नसल्यामुळे अनेक दिवस बंद असुन ते भंगारात सडत आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना तातडीने आरोग्य सुविधा मिळणेसाठी 102 व 108 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध केले असुन तशा प्रकारची वाहने हि ठिकठिकाणी असणाऱ्या आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रात उपलब्ध करुन दिली आहेत. असे असताना नारिवली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरोग्य विभागाने एम.एच 48 सी 39 हे वाहन. उपलब्ध असुन त्या वाहनावर चालक नसल्यामुळे म्हसा धसई माळशेज व बदलापुर म्हसा माळशेज या मार्गावर होणाऱ्या अपघातामुळे जखमी होणाऱ्यांना तसेच प्रसुतीसाठी गर्भवती महिलांना तातडीने उपचार मिळणेसाठी शासकीय वाहन उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना हजारो रुपये मोजुन खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असला तरी या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याने आरोग्य विभागाचे कारभारा बाबत नागरिकामध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment