Tuesday 27 October 2020

विविध मागण्यांसाठी सिटु संघटनेची मुरबाड तहसीलदार कार्यालयावर धडक !! **हल्ला बोल करीत कंपनी व्यवस्थापनाचा निषेध **

विविध मागण्यांसाठी सिटु संघटनेची मुरबाड तहसीलदार कार्यालयावर धडक !!
**हल्ला बोल करीत कंपनी व्यवस्थापनाचा निषेध **


मुरबाड (मंगल डोंगरे) : गेल्या काही महिण्यापासून मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील कंपनी मालकांची मनमानी वाढली असुन त्याचा फटका स्थानिक कामगारांना बसत असुन, अचानक पणे कुठलीही पुर्वसुचना न देता धानिवली येथील पाँवर प्लान बंद करून 60 कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ आज सिटु संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी तिनहात नाका ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढून धडक देण्यात आली.


            यावेळी या मोर्चात सुमारे दोनशे ते अडीचशे कामगार सहभागी झाले होते. कोरोना संकट असल्यामुळे पोलीस प्रशासनाने सुचवलेल्या नियमांचे पालन करत मोर्चा तहसीलदार कार्यालयावर पोहचल्यावर संघटनेचे प्रतिनिधी यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करत, धानिवली येथील पाँवर प्लान मधील कामगारांना त्वरित कामावर घेण्यात यावे. फ्युज्यो ग्लास कंपनीची थांबवलेली पगार वाढ करून कंपनी बाहेर असलेल्या कामावर घेण्यात यावे. अँरोफार्मा कंपनी सुरू करण्यात यावी. मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटी पद्धत बंद करावी. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कामगारांच्या पसंतीच्या युनियन सोबत चर्चा करून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे. अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन सिटु संघटनेच्या वतीने शिष्ट मंडळाने मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांना देऊन कामगारांना न्याय देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे काँ.देविदास आडोळे; काँ.विजय विशे; प्रशांत महाजन; संतोष काकडे; दिलीप कराळे; सागर भावार्थ; मनिष फोडसे; चंद्रकांत राणे; रामचंद्र भोईर; सुनील लाटे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह शेकडो पिडीत कामगार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...