Wednesday 28 October 2020

महात्मा गांधी विद्यालय धसईच्या अनागोंदी कारभाराच्या चौकशीची पालक वर्गाची मागणी ..

महात्मा गांधी विद्यालय धसईच्या अनागोंदी कारभाराच्या चौकशीची पालक वर्गाची  मागणी  ..


मुरबाड (मंगल डोंगरे) :
मुरबाड तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय धसई कडून पालक व विद्यार्थ्यां कडुन अवाच्यासव्वा फी साठी लबाडणूक होत असल्याची तक्रार पालकाकडून होत असुन; संबंधित कारभाराची चौकशीची ही मागणी होत असुन; सदर प्रकरणी मुख्यमंत्री ते शिक्षण मंत्र्याकडे लेखी तक्ररी द्वारे दाद मागली जात आहे .


शिक्षणमहर्षी म्हणून लौकिक असलेल्या स्व.शांताराम भाऊ घोलप यांच्याच गावात विद्यार्थ्यांना सक्तीच्या फी वसुलीला सामोरे जावे लागत असल्याने पालक वर्गाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विद्यार्थ्यांना सायन्स, आर्ट, टेक्निशियन या शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ७ हजार ५ हजार रुपये फी तसेच जनसेवा शिक्षण मंडळाच्या इमारतीसाठी १७० रु.अशा एकुण ११ वेगवेगळ्या प्रकारच्या कारणासाठी पैसे घेण्यात येतात. धक्कादायक बाब म्हणजे या विद्यालयाचे प्राचार्य मागिल तिस वर्षांपासून कार्यरत असुन ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांन कडुन हजारो रुपये घेऊन १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना १७ नंबर चा फॉर्म भरून परीक्षेसाठी प्रवेश दिला जाऊन परीक्षा चालू असताना खुलेआम विद्यार्थ्यांना कॉफीॅंचा पुरवठा केला जातो. परीणामी अभ्यास केला नसलेले विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतात. या सर्व गैर प्रकारा बाबत अनेक वेळा वर्तमानपत्रातून फोटो सहीत बातम्या येऊन सुध्दा कारवाई होत नसल्याने पालक वर्गाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे येथील प्राचार्यांनी अशा गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमविली असुन या बाबत अनेक पालकांनी वारवार चौकशी करूनही काही होत नसल्याने मुजोर झालेल्या प्राचार्याना परिस्थीतीच भान राहिल नाही. गेले सहा महिने कोरोनाच्या महामारीत शेतकरी पालक वर्ग अन्नाला मोहताज झाला असतानाच परतीच्या पावसाने भाता सोबत शेतकरीच अडवा केला असुन दृष्काळसदृश्य परिस्थीतीत होरपळलेल्या शेतक-याच्या मुलांना येथे प्रवेश घेण्यासाठी एक रुपया देखील फि कमी केली जात नाही व पुर्ण रक्कम दिल्या शिवाय प्रवेश दिला जात नाही. प्रवेशासाठी भरला जाणारा फार्म त्याचे देखील २० रुपये आकारले जातात. या विद्यालयातील अनागोदी कारभाराची चौकशी  करण्यात येऊन येथे गेले तीसवषॆ पालकांची विद्यार्थ्याची लुटमार करुन कोट्यावधीची  बेहिशोबी मालमत्ता करणा-या प्राचार्याची चौकशीची मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...