Wednesday 28 October 2020

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रथमच नैसर्गिकरित्या जुळ्या मुलांचा जन्म !! "आदिवासी महिलेने मानले डॉक्टरांचे आभार".

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रथमच नैसर्गिकरित्या जुळ्या मुलांचा जन्म !! "आदिवासी महिलेने मानले डॉक्टरांचे आभार".


मुरबाड :--(मंगल डोंगरे) : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेशा सुविधा नसल्यामुळे आदिवासी महिलांना प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते.परंतु तेथेही भुल तज्ज्ञांच्या अभावी शस्रक्रिया विभाग बंद असल्याने गोरगरीब जनतेला खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत असताना आज सरळगाव आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रातील लक्ष्मी हिलम वय 30 वर्षे हि आदिवासी महिला प्रसुतीसाठी आली असता डॉ. हेमंतकुमार खंबायत व डॉ. विक्रांत गुजर तसेच डॉ. स्वप्नील वाघचौडे यांनी सदर महिलेच्या गंभिरतेचा आणि परिस्थितीचा विचार करुन रुग्णालयात शस्रक्रिया विभाग नसताना त्या महिलेची नैसर्गिकरित्या प्रसुती केली असता त्या महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिल्याने मुरबाड ग्रामीण रुग्णालयात जुळ्या बाळांना नैसर्गिकरित्या जन्म देणारी हि पहिलीच महिला असल्याने नातेवाईकांनी या डॉक्टरांना धन्यवाद दिले आहेत.

           तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि खाजगी हाँस्पिटलचे संगनमताने गोरगरीब जनतेची लुटमार होत असल्याने किरकोळ आजारावर मोफत उपचार घेण्यासाठी तसेच प्रसुतीसाठी महिला  ग्रामीण रुग्णालयात धाव घेत असल्या तरी गेले अनेक दिवस ग्रामीण रुग्णालयात भुलतज्ञ नसल्यामुळे शस्रक्रिया विभाग बंद आहे. त्यामुळे एखादी जोखमीची प्रसुती आली तर ते डॉक्टर. त्या महिलेला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवितात. तेथे गेल्यानंतर त्या महिलेची नैसर्गिकरित्या प्रसुती होते व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना दोष दिला जातो. असे असताना आज सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कार्यक्षेत्रातील व्यापारी मानिवली येथील आदिवासी  महिला लक्ष्मी हिलम हिला पहिल्या दोन मुली असताना पुन्हा गरोदर होती परंतु आता तीच्या पोटात दोन मुले असल्याने तेथील डॉक्टरांनी तीला ग्रामीण रुग्णालयात पाठविले. परंतु तेथे असणाऱ्या डॉ. खंबायत यांनी सदर महिलेच्या गंभिरतेचा आणि आर्थिक परिस्थिती चा विचार करुन या महिलेची येथेच प्रसुती करायची म्हणुन डॉ. गुजरे व वाघचौडे यांचेशी विचार विनिमय केला आणि त्यांनी त्या महिलेची प्रसुती करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी त्यांनी एका खाजगी हाँस्पिटल मधिल महिला प्रसुती तज्ज्ञांची मदत घेऊन काही वेळातच या महिलेची नैसर्गिकरित्या प्रसुती केली असता त्या महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला असुन दोन्हीही बाळांची व आईची प्रक्रुती हि सुखरूप आहे.  

             सदर डॉक्टरांनी अथक प्रयत्नाने हि प्रसुती केली असली तरी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात हि प्रथम जुळ्या बाळांना नैसर्गिकरित्या जन्म देणारी  पहिलीच महिला असुन डॉक्टरांनी केलेल्या विशेष कामगिरीचे नागरिकामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...