Wednesday, 28 October 2020

शेतकरी व कामगार विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी वसईत शनिवारी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन !

शेतकरी व कामगार विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी वसईत शनिवारी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन !


"३१ ऑक्टोबर रोजी किसान अधिकार दिवस पाळणार" 

वसई  : शेतकरी व कामगारांवर अन्याय आणि त्यांची घोर फसवणूक करणाऱ्या केंद्र सरकार आणू पाहत असलेल्या कायद्यास कडाडून विरोध करण्यासाठी वसई विरार जिल्हा काँग्रेसतर्फे शेतकरी अधिकार दिवस पाळून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवार दि . ३१ ऑक्टोबर २०२० रोजी सरदार वल्लभभाई पटेल जयंती तसेच स्व. इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी म्हणजे हुतात्मा दिन आहे. याच दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार वसई विरार जिल्हा काँग्रेसतर्फे किसान अधिकार दिवस पाळण्यात येणार आहे. तसे पत्र नुकतेच वसई तहसीलदारांना देण्यात आले आहे. भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या होऊ घातलेल्या शेतकरी, शेतमजूर तथा कामगार विरोधी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वसई विरार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० ते सायं . ४.०० या वेळेत हुतात्मा चौक, पापड़ी, वसई येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. वसई विरार जिल्हा काँग्रेसतर्फे शेतकरी, शेतमजुर, कामगारवर्ग व नागरिकांच्या घरोघरी जाऊन सह्यांची मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली आहे .

No comments:

Post a Comment

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !! ** ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाव...