Saturday, 24 October 2020

बाळ कुशित असताना मातेच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू ! "चार महिन्याचे बाळ माञ सुखरूप" !

बाळ कुशित  असताना मातेच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू !     
"चार महिन्याचे बाळ माञ सुखरूप" !


मुरबाड - (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार परतीचा पाऊस पडत असतानाच गुरुवार दि. २२ रोजी तालुक्यातील तागवाडी येथे संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या  वेळेस आपल्या घरात चिमुरड्याची भूक भागवण्यासाठी उराशी घेतलेल्या चार महिन्याच्या बाळाला माऊली दुध पाजित असताना अंगावर वीज पडून त्या मातेचा जागीच मृत्यू झाला तर चार महिन्याचा बाल सुखरूप वाचला आहे. सदर विज घरावर पडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील तागवाडी (मोहघर) येथे राहणारी प्रिती रमेश मेंगाळ (वय २४) ही महिला आपल्या चार महिन्याच्या आपल्या   चिमुरड्याला उराशी घेऊन दूध पाजत असताना गुरुवारी सायंकाळच्या वेळेस विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला त्यात या मातेच्या अंगावर वीज पडून मातेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर चार महिन्यांचा बालक सुखरूप असल्याची माहिती मुरबाड पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. म्हसा  महसूल विभागाकडून सूद्धा या घटनेचा पंचनामा केला गेला असल्याची माहिती नायब तहसिलदार (महसुल) बंडू जाधव यांनी दिली.               
या महिलेच्या निधनाने तागवाडी, मोहघर, पाटगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...