Saturday, 24 October 2020

माणगाव तालुक्यातील तलाठी/मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधणीसाठी जमीन हस्तांतरण मंजूर - पालकमंत्री आदिती तटकरेंचा महत्वपूर्ण निर्णय.

माणगाव तालुक्यातील तलाठी/मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधणीसाठी जमीन हस्तांतरण मंजूर - पालकमंत्री आदिती तटकरेंचा महत्वपूर्ण निर्णय.


       बोरघर / माणगाव (विश्वास गायकवाड) : तालुक्यातील काही गावांमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत बांधणी होणे आवश्यक बनले होते. नागरिकांकरिता तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय हे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय असून या दृष्टीने नागरिकांना विनासायास त्यांची जमिनीविषयक तसेच अन्य तत्सम कामे होण्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. याचे महत्त्व ओळखून व गरज लक्षात घेऊन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या गावातील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारती बांधण्यासाठी जमीन देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले होते.
        त्यास अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी माणगाव तालुक्यातील चांदोरे, नांदवी,उणेगाव, लोणेर,दहिवली त. गाेवेले, थरमरी, हाेडगाव, जिता, तळेगाव, पन्हळघर बु., मुद्रे, खरबाची वाडी, हरकाेल, रातवड,चाच, बामणाेली, कालवण, मोर्बा, सुरवत त.तळे, पहेल, मलई काेंडवणी, साले, पोटनेर या गावांमधील तलाठी सज्जा कार्यालय इमारत बांधणीच्या दृष्टीने संबंधितांच्या मागणीप्रमाणे शासकीय जागा हस्तांतरित करण्याचे आदेश पारित केले आहेत तसेच पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना दिले आहेत.
       या निर्णयामुळे माणगाव तालुक्यातील या गावांमधील गावकऱ्यांना अद्ययावत व सुसज्ज अशा तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयातून उत्तम शासकीय सेवा व साेयीसुविधा मिळतील, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !! ** ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाव...