Wednesday, 28 October 2020

सिध्दी कामथ यांची अ.भा.म.चि.महामंडळच्या तक्रार निवारण समिती सदस्य पदी नियुक्ती !!

सिध्दी कामथ यांची अ.भा.म.चि.महामंडळच्या तक्रार निवारण समिती सदस्य पदी नियुक्ती !!


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
    पक्षविरहीत सामाजिक राष्ट्रीय संघटना म्हणून कार्यरत असलेल्या भारतीय महाक्रांती सेना (नोंदणीकृत)च्या राष्ट्रीय प्रवक्त्या सिद्धीताई विनायक कामथ (अभिनेत्री/समाजसेविका) यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळतर्फे "तक्रार निवारण समिती" च्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र अ.भा.म.चि.महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिले. सिध्दी कामत यांची कोरोना काळात केलेली मदत लक्षात घेऊन विविध संस्था व मिडियातर्फे "कोरोना योध्दा" या सन्मानपत्रने गौरव केलेला आहे. सिध्दी कामत महामंडळाचे ध्येयधोरण व उदिष्ट्ये तसेच घटना नियमांच्या अधिन राहून प्रमाणिकपणे काम करतील व  तक्रारदारांना योग्य तो न्याय देण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करतील असे मत अनेकांकडून या नियुक्ती नंतर व्यक्त करण्यात आले. सिध्दी कामथ यांच्या या नियुक्तीबद्दल अ.भा.म.चि, महामंडळ कोल्हापूर प्रमुख कार्यालय तसेच मराठवाडा विभागीय कार्यालय, मुंबई शाखा कार्यालय, औरंगाबाद/सातारा विभागीय कार्यालय, पुणे शाखा कार्यालय पदाधिकारी व सदस्य,सभासद त्याचप्रमाणे अविनाश सकुंडे (राष्ट्रीय अध्यक्ष), संजय जाधव पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष) वकील आघाडी , आनंद गुगळे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) सुलेमानभाई खान (मुंबई जिल्हा अध्यक्ष) यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी,सदस्य व विविध सामाजिक संघटना, मित्रपरिवारातर्फे अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.  

No comments:

Post a Comment

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम...

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम... मुरबाड- (योगेश्वरी मणी)  येथील जिल्हा परिषद प्राथमिक ...