Friday 23 October 2020

महापालिका कर्मचा-यांची ५० हजार रुपये बोनसची मागणी !

महापालिका कर्मचा-यांची ५० हजार रुपये बोनसची मागणी !


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेची आर्थिक स्थिती खालावली असली, तरीही पालिका कामगारांकडून २०१९-२० आर्थिक वर्षासाठी ५० हजार रुपये बोनसची मागणी पुढे आली आहे. पालिका संघटनांनी पालिका आयुक्त आणि महापौरांकडे याबाबत मागणी केली आहे. दि म्युनिसिपल युनियनने पालिकेच्या सर्व कामगार, कर्मचा-यांना २०१९-२०च्या वर्षातील उत्पन्नाच्या २० टक्के इतका बोनस देण्याची मागणी केली आहे. तर, म्युनिसिपल मजदूर संघाने ५० हजार रु. बोनसची मागणी उचलून धरली आहे.मुंबईत कोरोनाने मार्चपासून हातपाय पसरण्यास सुरुवात केली. तेव्हापासून पालिकेची यंत्रणा कोरोनाविरोधात उभी ठाकली आहे. त्यात पालिकेच्या सर्वच विभागांनी अव्याहत सेवा देणे सुरू ठेवले आहे. त्यात पालिका कर्मचा-यांसह अधिकारी, डॉक्टर, इंजिनीअर, तंत्रज्ञ, कंत्राटी कामगारांसह अनेक जण जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांना २०१९-२० आर्थिक वर्षाच्या एकूण उत्पन्नाच्या २० टक्के बोनस द्यावा, अशी मागणी युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पत्राद्वारे केली आहे. पालिका आयुक्त आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना लिहिलेल्या पत्रात या मागणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...