Friday 23 October 2020

तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करा तहसीलदारांचे आदेश !

तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करा तहसीलदारांचे आदेश !


मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुका हा ९०% भातपिकावरच अवलंबुन असला तरी परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेला भातपिकासोबत शेतक-याला भुईसपाट केल्याने शेतक-याना तात्काळ मदत मिळावी म्हणून कृषी विभाग; ग्रामसेवक; महसुल विभागाला पंचनामे सादर करण्याचे आदेश तहसिलदार अमोल कदम यांनी देऊन संपुर्ण तालुक्याचे पंचनामे दोनच दिवसात पार पडणार असल्याची माहिती कदम यांनी दिली. विक्रमी उत्पादन घेणारा म्हणुन लौकिक असलेल्या मुरबाड तालुक्यात या वर्षी भाताचे पीक कापणी करण्यास सज्ज झालेल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या पावसाने पुर्णपणे पाणी फेडले. भाताचे पीक घेऊन तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामासाठी तयारी सुरू करतो पण या वर्षी भाताची शेते पाण्याने तुडुंब भरली असल्याने रब्बी पिके घेण्यासाठी काही दिवस थांबावे लागेल अशा संकटात तात्काळ आर्थिक मदत पोहचणे गरजेचे आहे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पक्ष्यांच्या नेत्यांनी या वेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली हे नाकारता येणार नाही. परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडे सादर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत पोहचणे दुरापास्त आहे म्हणुन मुरबाड तालुक्याचे तहसीलदार अमोल कदम यांनी तलाठी ग्रामसेवक, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांना दोन दिवसांत कोणताही शेतकरी मदती पासुन वंचित रहाणार नाही याची खबरदारी घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत कारण सन.२०१७ ला अश्या प्रकारचा ओला दुष्काळ पडला असता कही शासकीय कर्मचाऱ्यांनी पंचनामे करताना तसेच शासनाने कडे सादर करताना दुर्लक्ष केले होते परीणामी अनेक शेतकरी मदती पासुन वंचित राहीले होते म्हणून तहसीलदार कदम यांनी या कोणी ही वंचित राहता कामा नये हि दक्षता बाळगली आहे कोरोनाच्या महामारीत अगोदरच शेतकरी भरडाला आहे. त्यातच हे अस्मानी संकटात हलगर्जीपणा न करता पंचनामे करून तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...