Wednesday 19 June 2024

कडोंमनपा स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर कमावतात महिन्यात पाच लाख रुपये - माहिती अधिकार कार्यकर्ते मेढेकर

कडोंमनपा स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर कमावतात महिन्यात पाच लाख रुपये - माहिती अधिकार कार्यकर्ते मेढेकर 

*** आयुक्तांचे यांच्यावर नाही नियंत्रण म्हणून स्वच्छता अधिकारी करतात अशा प्रकारचे गैरव्यवहार

कल्याण, प्रतिनिधी :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका 'ब' प्रभागक्षेत्र येथे कार्यरत असलेले स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर यांनी अनेक गैर-मार्गाने आर्थिक देवाण-घेवाण करीत असून याबाबत अधिक माहिती अशी की या प्रभागामध्ये कचरा उचलण्याचे काम आर.अ‍ॅन्ड बी. कंपनीला दिलेले असून हे काम या कंपनीकडून करून घेण्यासाठी येथे स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. यांनी नियमित कचरा उचलण्याच्या कामात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले आहेत. वरिष्ठांच्या आदेशाला यांनी केराची-टोपली दाखवून उपायुक्त घकव्य यांची दिशाभूल करून वरिष्ठांच्या आदेशाला पाने पुसले आहेत. 

                    स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर 

या प्रभागामध्ये शून्य कचरा मोहीम किंवा कचरा वर्गीकरणाचा फज्जा उडाला असून अनेक ठिकाणी मिक्स कचरा घेतला जातो दुसरीकडे मुख्यालय येथून मनपाची यंत्रणा घेऊन तिचा दुरुपयोग केला आहे ती यंत्रणा वापरण्याऐवजी ती यंत्रणा हप्त्यावर ठेवून त्यामधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मालमत्ता जमा केली आहेत. त्यापैकी काही यंत्रणा यांनी परस्पर इतरत्र पाठवण्याचे काम केले आहेत. 

पेस्ट-कंट्रोल (फवारणी) विभागात काम करणाऱ्यां कामगारांची मांजरेकर यांच्याकडे कोणतीही काम केल्याची नोंद नाही. किती कामगार आहेत किती हजर आहेत किंवा किती गैरहजर त्यांचे कामाचे वेळापत्रक काय आहेत. याबाबत नोंद नसावी दुसरीकडे आर.अँड बी. या कंपनीवर दंडात्मक किती रक्कम रुपये कारवाई पोटी जमा केली याचाही यांच्याकडे कोणतीही लेखी माहिती नसावी. म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते मेढेकर यांना आजपर्यंत माहिती देण्यात आलेली नाही. 

माहिती दिलेली नाही म्हणून मेढेकर यांनी अपील दाखल केले. त्यावरही आजपर्यंत येथील सहाय्यक आयुक्तांनी कारवाई केली नाही हे आयुक्त कायद्यापेक्षा मोठे झाले असावे म्हणून यांना माहिती दिली गेली नसावी किंवा मांजरेकर महिन्याला जे ५ लाख रुपये कमावतात किंवा कमवत असतील त्यामध्ये सहाय्यक आयुक्तांचाही काही प्रमाणावर हिस्सा असावा म्हणून माहिती दिली गेली नाही. विशेष म्हणजे मांजरेकर हे कित्येक वर्षापासून या प्रभागात ठाण मांडून बसले आहेत म्हणून यांची या प्रभागात मोठ्या प्रमाणावर दादागिरी सुद्धा सुरू आहेत. यांची बदली का झाली नाही. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत राज्य सरकारकडून येणारे उपायुक्त सहाय्यक आयुक्त हे डोळे मिटवून बसले आहेत का किंवा मांजरेकर यांच्या गैरव्यवहारात सामील आहेत का असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी याबाबत दुसरे अपील आयोगाकडे दाखल केले असून वेळ भासल्यास उच्च न्यायालयात जाण्याची तयारी देखील केली आहेत. मांजरेकर यांना तात्काळ सेवेतून कार्यमुक्त करावे आणि मांजरेकर सारखे अजून किती अधिकारी आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे करणार आहेत असे यासंबंधी मीडियाला प्रतिक्रिया नोंदविले आहेत.

No comments:

Post a Comment

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !!

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !! *** पेंढारकर कॉलेज मध्ये घडलेल्या घटनांच्य...