Wednesday 19 June 2024

महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !!

महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी  संस्था (रजि.) तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            
         विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी  संस्था ( रजि.) तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप तसेच कलर प्रिंटर उदघाट्न सोहळा नुकताच पार पडला.संस्थेच्या माध्यमातून मागील १० वर्षे पासून कोकण विभागातील अति दुर्गम भागात शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. याही वर्षीही  संस्थेच्या माध्यमातुन पालघर विभागातील दुर्गम गावातील जि.प. शाळा, दिवेकर पाडा  या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप(रविवार दि.१६ जून) करण्यात आले. त्याच बरोबर आजू -बाजूच्या परीसरातील शाळांना मिळून संस्थेच्या माध्यमातून १ नविन कलर प्रिंटर देखील देण्यात आला.

         शाळेचा पहिला दिवस असल्या कारणामुळे सर्व आंगणवाडी, शाळेच्या विद्याथ्यांचे संस्थेच्या माध्यमातून गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले. या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम आणि कलर प्रिंटर विद्यार्थीयांसाठी अर्पण उपक्रम यशस्वी करण्यात जिल्हा परिषद दिवेकर पाडा या शाळेतील शिक्षक आदेश भोईर सर, बहाडोली केंद्राचे केंद्र प्रमुख विलास घरत सर, अंगणवाडी सेविका नयना पाटील, मंगेश पाटील सर, तसेच ज्यांनी कलर प्रिंटर घेण्यास संस्थेस आर्थिक सहकार्य केले ते अनिल खिल्लारी, पूनम खिल्लारी, कु. अमुल्य खिल्लारी आणि शैक्षणिक साहित्य घेण्यास ज्यांनी आर्थिक , वस्तू स्वरूपाची मदत केली ते सर्व देणगीदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचे यनिमित्ताने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
         या कार्यक्रम प्रसंगी दिवेकर पाड्यातील ग्रामस्थ, पालकवर्ग, विद्यार्थी, शिक्षक वर्ग, संस्थेचे सदस्य, पदाधिकारी -प्रसाद मांडवकर, स्वाती  गावडे, निलेश कुडतरकर, गौतम बनसोडे, रंजिता सावंत, संगीता सावकारे, लक्ष्मी गुडिलू, आयुष बनसोडे, विक्रम नागांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपरोक्त संस्थेचा कोणताही  उपक्रम यशस्वी होणे या मान्यवर व्यक्ती शिवाय अशक्य आहे.जे निस्वार्थपणे संस्थेच्या पाठिशी ठाम पणे उभे असतात ते संस्थेचे सर्व देणगीदार, कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांचे मन पूर्वक यानिमित्ताने आभार व्यक्त करण्यात आले.असाच विश्वास आणि प्रेम संस्थेवर यापुढेही दाखवाल असा विश्वास महात्मा ज्योतिबा फुले बहुुउद्देशिय सेवा भावी संस्था ( रजि ) तर्फे व्यक्त करून कार्यक्रमची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !!

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !! *** पेंढारकर कॉलेज मध्ये घडलेल्या घटनांच्य...