Wednesday 19 June 2024

गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ द्या !!.

गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ द्या !!. 

** 2 जुलैस पावसाळी अधिवेशनावर धडक देणारा.. आयटक चा इशारा
जळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे ३५०० पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत, आशा गटप्रवर्तक यांच्यासाठी दिनांक 14 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासन नाने मानधन वाढीच्या निर्गमित केलेल्या जीआर मध्ये गटप्रवर्तकांना फक्त 1000 रुपये एवढीच अत्यल्प वाढ केलेली आहे. त्यामुळे सुमारे 25000 लोकसंख्येत काम करणाऱ्या उच्चशिक्षित  गटप्रवर्तक महाराष्ट्र शासनावर नाराज झाल्या आहेत, राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये गट प्रवर्तक या सुपरवायझिंग चे काम गेल्या पंधरा वर्षापासून काम करीत आहेत. या गटप्रवर्तकांना संप काळात म आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना चार महिन्यापूर्वी त्यांच्या झालेल्या संपर्क काळात 6200 रू व मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार 3800 रुपयाची भर घालून एकूण 10000 रुपये मानधन वाढ देण्याचे कबूल केले होते. परंतु प्रत्यक्षात मानधनात 1000 रू ची वाढ करून शासनाने चेष्टा केल्याची भावना त्यांच्यात निर्माण झालेली आहे. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 25 आशा स्वयंसेविकांचे कामाचे परिवरक्षण करावे लागते त्यांच्या रिपोर्ट तयार करावा लागतो तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात महिन्याला 25 दिवस दौरे करून आशांना भेटी देऊन मार्गदर्शन करावे लागते. त्यांच्या सर्व अपडेट रेकार्ड ठेवावे लागते आणि दरमहा  वरिष्ठांना सादर करावे लागते.. या व्यतिरिक्त मोबदला नसलेली सात आठ काम सुद्धा त्यांना करावी.. जागतिक कोविड साथीचे काळात त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केले आहे  असे असताना त्यांना मासिक वेतन न देता त्यांना टी ए डी ए पोटी  मिळणारे  रकमेवरच संसार चालवावा महाराष्ट्र शासनाचे म्हनने आहे. आणि ते चूक आहे म्हणून गटप्रवर्तकांच्या मानधनात किमान 10000रु ची भरघोस वाढ करावी.. 

त्यांना गटप्रवर्तक ऐवजी सुपरवायझर म्हणावे कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे हक्क मिळावेत संप काळातील कपात केलेले मानधन देणे व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करणे या मागण्या मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गटप्रवर्तकांचा येत्या 2 जुलै या मोर्चात जळगाव जिल्ह्यातील गटप्रवर्तक सहभागी राहतील व शासनाने या प्रशनी लक्ष घालावे म्हणून महाराष्ट्र राज्य आयटक चे राज्य उपाध्यक्ष काँ अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले त्यावेळी जळगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव ,भुसावल, बोदवड या तालुक्यातील 50 चे वर गटप्रवर्तक िनी सहभागी झाल्या होत्या त्यात सर्व श्रीमती ज्योती पाटील राधा धनगर रूपाली माळी छाया मोरे सुरेखा साळुंखे कविता सरोदे मीनाक्षी पाटील प्रतीक्षा क्षीरसागर वनिता बारी हर्षदा पाखले वर्षा भंडारकर शीला कोळी रूपाली महाजन जयश्री सूर्यवंशी अपेक्षा माळी शोभा पाटील संगीता पाटील आशा पाटील.. आदी 50 गटप्रवर्तक हजर होत्या मुक्ताईनगर चे आमदार श्री चंद्रकांत पाटील हे कलेक्टर कचेरीत आले असता गटप्रवर्तकांनी यांनी निवेदन दिले आहे व विधानसभेत या प्रश्न आवाज उठवावा अशी विनंती केली आहे जिल्ह्यातील अनेक आमदारांना या प्रश्न आवाज उठवा म्हणून विनंती केली जाणार आहे. दोन जुलै मोर्चासाठी जिल्ह्यातील गटप्रवर्तकांनी एक जुलै रोजी जळगाव रेल्वे स्टेशनला जमावे आवाहन कॉ. अमृतराव महाजन यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...