Thursday 20 June 2024

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी सेनेच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदी राज कोयते यांची नियुक्ती !!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी सेनेच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदी राज कोयते यांची नियुक्ती !!

** कल्याण शहराध्यक्ष पदी निलेश कोनकर यांची नियुक्ती

कल्याण, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदी राज कोयते तसेच कल्याण शहराध्यक्ष पदी निलेश कोनकर यांची नियुक्ती माननीय मा. कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष राज कोयते यांचे वडिल बाळाराम कोयते हे राष्ट्रवादी काँग्रेस स्थापने पासून माननीय शरदचंद्रजी पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करत आले आहेत. कल्याण डोंबिवलीत बाळाराम कोयते यांची साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता तसेच त्यांचे शहरातील सामाजिक कार्य यामुळे त्यांची ओळख आहे. तसेच त्यांचे सुपुत्र राज कोयते यांना सुध्दा सामाजिक कार्याची आवड असून ते विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत आले आहेत. 

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी सुध्दा त्याच्या कामाचे कौतुक केले असून आज त्यांची निवड झाली यासाठी अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी विद्यार्थी सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष किरण गोरक्षनाथ शिखरे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती माननीय मा. कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कल्याण अध्यक्ष संदीप देसाई, निष्ठावंत कार्यकर्ते बाळाराम कोयते, विनोद काळे, संजय भोईर, कल्याण डोंबिवली येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !!

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !! *** पेंढारकर कॉलेज मध्ये घडलेल्या घटनांच्य...