Thursday 20 June 2024

ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महिला बचत गटांनी शिवलेले शालेय गणवेश !!

ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महिला बचत गटांनी शिवलेले शालेय गणवेश !!

** ठाणे जिल्ह्यातील बचत गटांमार्फत 1,04,703 गणवेश होणार तयार

ठाणे, प्रतिनिधी :
 – समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावाणी सुरू झाली आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ठाणे जिल्ह्यातील बचत गटांना मिळाले आहे. जिल्ह्यातील बालकांच्या अंगावर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी शिवलेले गणवेश दिसणार आहेत. जिल्ह्यासाठी एकूण सुमारे 1,04,703 गणवेश शिलाई करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी 15 जून रोजी ग्रामीण भागातील 1201 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे.

राज्य शासनाने समग्र शिक्षा कार्यक्रम अंतर्गत एक राज्य एक गणवेश योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत वाटप करावयाच्या मोफत गणवेशाच्या शिलाई करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटातील महिलांना मिळाले असून यातून बचत गटाच्या महिलांना रोजगारची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात एकूण 104703 गणवेश शिवणकाम बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून पूर्ण होत आह
यंदाच्या वर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दि. 15 जून 2024 रोजी मोफत गणवेश योजनेअंतर्गत भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड व अंबरनाथ या 6 तालुक्यामधील एकूण 6 केंद्र शाळेतील 1201 विद्यार्थ्यांचे गणवेश पोहोच करण्यात आले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रथम दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून देऊन आनंदाची भेट देण्यात आली. यावेळी गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग तसेच माविम जिल्हा प्रतिनिधी व सीएमआरसीचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटांतील महिलांना मिळावे यासाठी शासन स्तरावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच मुख्यालय स्तरावरून या उपक्रमाची अंमलबजावणी योग्यरित्या होऊन विहित वेळेत शिवणकाम पूर्ण होण्यासाठी प्रकल्प संचालक कुसुम बाळसराफ, महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) रविंद्र सावंत, महाव्यवस्थापक (प्रकल्प) महेंद्र गमरे मेहनत घेतली. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात या प्रकल्पाची अंलबजवणी होऊन विद्यार्थ्यांना विहित वेळेत गणवेश पुरवठा व्हावा यासाठी कार्यक्रम व्यवस्थापक रूपा मेस्त्री, गौरी दोंदे, वित्त व लेखा अधिकारी राखी मिराशी व व्हॅल्यु चेन सल्लागार महेश कोकरे यांनी जिल्ह्यांना मार्गदर्शन केले.
गणवेश शिलाईचे कामकाज वेळेत पूर्ण करून शाळेत पोहच करण्यासाठी सर्व सीएमआरसीतील गारमेंट युनिट मोठ्या जोमाने काम करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील सीएमआरसी मार्फत कुशल महिलांना रोजगार मिळावा यासाठी महिलांची निवड करणे, त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी माविमचे विभागीय सल्लागार मंगेश सूर्यवंशी, माविमच्या ठाणे जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती अस्मिता मोहिते यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून हे कामकाज यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...