Wednesday 28 October 2020

आेबीसींच्या मागण्यांसाठी बारा बलुतेदारांना घेवून मा.खा.हरिभाऊ राठोड बसणार उपोषणास !!

आेबीसींच्या मागण्यांसाठी बारा बलुतेदारांना घेवून मा.खा.हरिभाऊ राठोड बसणार उपोषणास !!



ठाणे,प्रतिनिधी - ओबीसीमधील अतिमागासांना मिळणार्‍या आरक्षणाचे फायदे आज पर्यंत मिळाले नाहीत. परिणामी, राज्यातील बारा बलुतेदार समाज मोठ्या प्रमाणात विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळे या बलुतेदारांना स्वतंत्र 4 टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी ओबीसी, भटकेविमुक्तांचे नेते मा. खा. हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 29) राज्यभर जिल्हाधिकारी/ तहसील कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मा. खा. हरिभाऊ राठोड हे स्वत: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजेपासून उपोषणाला बसणार आहेत
गुरव, कुंभार, कासार, मिस्त्री, लोहार, न्हावी, पांचाळ, धोबी, शिंपी, सोनार, वाडी - खाती, सोनार-बंजारा, हे राज्यातील बारा बलुतेदार समाज सद्या 19 टक्के आरक्षणामध्ये आहे, परंतु या 19 टक्के आरक्षणामध्ये त्यांना कुठलाही लाभ मिळत नाही, कारण ओबीसी मधल्या ज्या पुढारलेल्या जाती आहे, ह्या संपूर्ण आरक्षणाचे लाभ उचलत आहे, म्हणून 19 टक्के आरक्षणा मधून वेगळे 4 टक्के स्वतंत्र आरक्षण दयावे अशी मागणी, माजी खासदार व माजी आमदार तथा आरक्षणाचे अभ्यासक, हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकार या न्यायालयाच्या निवाड्यानुसार हे आरक्षण राज्य सरकार देऊ शकते असेही त्यांचे मत आहे.
या संदर्भात महाराष्ट्रात बारा बलुतेदारांचे हे जनआंदोलन तीव्र करण्यासाठी येत्या गुरुवार दि 29 ऑक्टोबर, 2020 रोजी दुपारी 12 वाजता सर्व तालुका आणि जिल्हा कचेरीवर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्याचे जाहीर आवाहन, माजी खासदार व माजी आमदार तथा आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड तथा बारा बलुतेदार समाजाचे सर्वश्री प्रा.प्रकाश सोनवणे, प्रा. नागोराव पांचाळ, डॉ.पी.बी.कुंभार, अरुण शिंपी, प्रताप गुरव, रंजन दीक्षित, पराग अहिरे, बाबूसिंग कडेल, विजय बिरारी यांनी बारा बलुतेदार समाजाला केले आहे

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...