Sunday 23 May 2021

मोहिली पावशेपाडा पोहच रस्त्याचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन, अनेक गावांना होणार फायदा!

मोहिली पावशेपाडा पोहच रस्त्याचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन, अनेक गावांना होणार फायदा!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील मोहिली ते पावशेपाडा यांना जोडणाऱ्या पुलाचे काम जवळपास पूर्ण होऊन देखील जागेच्या वादामुळे हा रस्ता गेल्या कित्येक महिन्यापासून रखडला होता. अखेर आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर याच्या कामाला सुरुवात झाली असून या पोहच रस्त्याचे उद्घाटन आज आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते झाले. यामुळे परिसरातील १०/१५ गावांना शहरी भागात येण्या जाण्यासाठी फायदा होणार आहे.


उलहासनदी मुळे कल्याण तालुक्याचे विभाजन झाले आहे. एका बाजूला मोहना, आंबिवली, टिटवाळा, खडवली उबार्णी, बल्याणी, मांडा अशी मोठी शहरे, यांच्याच बाजूला मोहिली, मानवली, संतेचा पाडा, वासुद्री, फळेगाव, घोटसई,  सांगोडा, कोढेरी, गुरवली, निंबवली, मोस, उशीद, तर नदीच्या दुसर्‍या बाजूला म्हारळ, वरप, कांबा, उल्हासनगर, बिर्लागेट, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर अशी मोठी शहरे व गावे यांना एकमेकांकडे जायचे यायचे असेल तर शहाड उड्डाण पूल, गोवेली किंवा तिकडिल लोकांना या शहरात यायचे असेल तर याच मार्गाने ये जा करावे लागत होते. यामुळे वेळ व पैसा खर्च होत होता.


त्यामुळे मोहना वाशियांनी अंबरनाथ चे आमदार किसन कथोरे यांना मोहिली ते पावशेपाडा असा उल्हास नदीवर पूल बांधून पोहच रस्ता बांधण्याची मागणी केली आहे. त्यावेळी आमदार किसन कथोरे यांनी तात्काळ याला मान्यता देऊन नाबार्ड २३ अंतर्गत सुमारे ५ कोटी रुपये मंजूर केले होते. यांनतर येथे प्रत्यक्ष काम सुरू झाले. ७ गाळयांचा पुल मोहिली बाजूकडून पुर्ण झाला. पण पावशेपाडा बाजूला एका सिंधी व्यापा-याने या विरोधात राष्ट्रपती पर्यंत तक्रार केली होती. त्यामुळे हे काम गेली काही महिने रखडले होते. मागील वर्षी आलेल्या पुरामुळे व काही भुरटय़ा चोरांनी पुलाचे संरक्षक पाईप कापून नेले होते.आमदार किसन कथोरे यांचा मतदारसंघ बदलाला असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. 
परंतु मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी मतदार संघ बदलला तरी पुन्हा या रस्त्यावर लक्ष केंद्रित करून नाबार्ड मधून पुन्हा या रस्त्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये निधी मंजूर केला. त्याचे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या पुलापासून ते कल्याण मुरबाड महामार्गा पर्यंत सुमारे १२०० मीटर लांबीचा रस्ता असून बाजूच्या गटारांची लांबी ३०० मीटर इतकी आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...