Saturday 22 May 2021

म्हारळ गावातील म्हारळेश्वर विद्यालयाचा सचिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता !!

म्हारळ गावातील म्हारळेश्वर विद्यालयाचा सचिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील म्हारळेश्वर विद्यालयाचा सचिव दिलीप हिंदूराव याला याच विद्यालयाच्या एका शिक्षिकेकडून साडेसात लाख रुपयांपैकी पहिलाहफ्ता तीन लाख रुपये 
घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे या भ्रष्टाचारात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह अजून कोण कोण मोठ मोठे मासे गळाला लागणार हे तपासात निष्पन्न होणार आहे. परंतु या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 


कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हारळ ग्रामपंचायत हद्दीत नेहमीच काहीतरी नवीन घडत असते. या गावात सन १९८३ मध्ये म्हारळेश्वर विद्यालय नावाने शाळा सुरू झाली. इयत्ता ५ वी ते १० वी पर्यत येथे शाळा असून ही विनाअनुदान तत्त्वावर सुरू आहे. या शाळेमुळे परिसरातील मुलांची शिक्षणाची सोय झाली. खरे. ट्रस्ट च्या माध्यमातून ही शाळा असल्यामुळे येथे सर्व अलबेल आहे. या शाळेचे सर्वेसर्वा दिलीप हिंदूराव हे असून त्यांचा कोचिंग क्लासेस देखील आहेत. हेच या शाळेत शिक्षक असल्याने ही मुले क्लासला घ्यायची त्यामुळे सगळे कसे अलबेल सुरू असताना या विद्यालयात मुरबाड तालुक्यातील शिरोशे या गावातील श्रीमती झापडे (माझी सरपंच) या शाळेत नोकरी लागल्या. कामावर रुजू होताना काही रक्कम दिली. पण मध्यंतरी यांना ब्रेक देण्यात आला. परंतु यांना परत कामावर घेण्याचा प्रस्ताव ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला. तसे प्रस्ताव ठाणे येथे पाठविण्यात आले होते. परंतु यासाठी शिक्षणाधिकारी चित्रा भार्गव यांनी विद्यालयाचे ज्याईन सेक्रेटरी दिलीप हिंदूराव यांच्या मार्फत पैशाची मागणी केली होती यानुसार श्रीमती झापडे यांनी या बाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी म्हारळेश्वर विद्यालयाच्या परिसरात सापळा रचला असता हिंदूराव यांनी रंगेहाथ पकडण्यात आले. या बाबतीत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलीप हिंदूराव याला कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून रितसर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात याच विद्यालयाचे एक ट्रस्टीला विचारले असता ते म्हणाले, विनाअनुदान शाळांचे नियम अनेक वेळा बदलत असतात. या शिक्षिका झापडे यांचा प्रस्ताव ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता. परंतु त्यांनी पैशाची मागणी केली होती. व ते सर्व पैसे ज्याईन सेक्रेटरी दिलीप हिंदूराव यांच्या जवळ दे ते मला सोमवारी देतील असे सांगितले होते. व त्यानुसार हे पैसे हिंदूराव यांच्या टेबलवर ठेवले होते. आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असा खुलासा यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला. 

या बाबतीत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून याकरिता बराच वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तपरंतु या प्रकरणामुळे शिक्षण विभागाचे कोण कोण या जाळ्यात अडकतात. तसेच इतर कोणी ट्रस्टच्या सदस्याचा समावेश आहे का हे तपासून निष्पन्न होईलच.पण शिक्षणाधिकारी चित्रा भार्गव यांना देखील अटक होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे परंतु या कारवाईमुळे कल्याण तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...