Monday 24 May 2021

युवा प्रेरणा प्रतिष्ठाण बनले अनाथांचा आणि निराधारांचा आधार !

युवा प्रेरणा प्रतिष्ठाण बनले अनाथांचा आणि निराधारांचा आधार !


नालासोपारा, (शांत्ताराम गुडेकर) :

       संपूर्ण जगभर गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू महामारी रोगाने थैमान घातलेला आहे. या महामारी च्या काळात अनेक सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन हे विस्कळीत झाले असतानाच युवा प्रेरणा प्रतिष्ठाण अनाथांचा आणि निराधारांचा आधार  बनले आहे. हे प्रतिष्ठाण गेल्या पाच वर्षा पासून नालासोपारा, ठाणे, गोरेगाव, मिरारोड, वाडा व अन्य ठिकाणी आपले अनमोल सहकार्य करत आहे. प्रतिष्ठाणचे (संस्थापक श्री. यश चंद्रशेखर माने ) यांचे कार्य म्हणजे नोकरी करून आलेला सर्व पगार या अनाथांना बहाल करणारे तरुण नेतृव आजवर कोठेच पहालयला मिळत नाही. अशा नेतृत्वाला आणि त्यांच्या विचाराना जोड मिळाली ती म्हणजे त्यांचे २०० शिलेदार अतोनात मेहनत घेऊन आपले शंभर प्रतिषद योगदान देत आहेत. यात सर्व सहकारी असून श्री. ओमकार राणे, सेफ- श्री आकाश रायत, आदित्य खैर, हरीश सिह, अनिकेत हजरा, आणि सर्व तरुण  सहकारी आपले योगदान देत आहेत. 
           या युवा प्रेरणा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून  आजवर असंख्य निराधार व अनाथांना आणि गरजूना सहकार्य मिळत आहे. विशेषतः या प्रतिष्ठाणमध्ये २०० सभासद असून सर्व सभासद तरुण आहेत. आणि विशेषतः शिक्षण घेत असताना हे सर्वात मोठे योगदान आपल्या प्रतिष्ठाणला देत आहेत. रंजल्या गांजल्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून या प्रतिष्ठाणला सुरवात झाली ती म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षा पासून. शाळेतून घरी येता जाता रस्त्यावरील अनाथ व निरक्षर मुले पाहुन त्या मुलांना वह्या व शिक्षण सामुग्री देऊन त्याच ठिकाणी म्हणजेच रस्त्यावरच शिक्षणाचे धडे या प्रतिष्ठाणने द्यायला सुरू केले ते आजवर अबाधित आहे. या सेवे सोबत ज्या व्यक्तींना अन्न मिळत नाही त्या व्यक्तींना स्वतः अन्न शिजवून त्यांच्या पर्यंत ते पोहोचवण्या साठी हे प्रतिष्ठाण कठिबद्द आहे. आज पर्यंत यात कोणताही खंड पडलेला नाही. शिवाय पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आदिवासी  वस्तीतील जनजीवन म्हणजे सर्व सुविधांपासून वंचित असलेले नागरिकांना प्रथम पाण्याचे टँकर व जीवनावश्यक वस्तू या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून  पोहोचवले जात आहे. खास करून तेथील महिला व झोपडपट्टी मधील महीला मासिकपाळी असताना सॅनिटरी पँड च्या ऐवजी कपड्याचा वापर करतात आणि त्या पासून खूप आजार होतात याचे महत्व पटवून दिले व तेथील महिलांना सॅनिटरी पँड वाटप करण्याचे आगळे वेगळे सहकार्य करण्यात आले. विशेषतः या समाजसेवेपलीकडे कोणताही हेतू नसून केवळ समाज सेवा आणि अनाथांची सेवा हाच उद्धेश प्रतिष्ठानने उराशी बाळगला आहे. रस्त्यावरील अनाथ मुले फक्त आकाशात गवसणी घालणारे विमान पाहून समाधान मानत होते. प्रत्यक्ष त्यात बसण्याचे स्वप्न कधीच साकार होणारे नसताना ते स्वप्न सत्यात मात्र युवा प्रेरणा प्रतिष्ठाणने उतरवले आणि नालासोपारा येथे त्या अनात मुलांना चक्क हँलिकॉप्टरने गगनाला गवसणी घातली. त्यामुळे  प्रतिष्ठाण व श्री. यश माने कायमचे हंलिकॉप्टर दादा या नावाने आज नावारूपाला आले आहेत. या प्रतिष्ठाणला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना प्रत्येकजण आपल्या खिशाला कात्री मारून हे अनमोल सगकार्य करत आहे. त्यात आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नसताना खऱ्या अर्थाने हे उभे राहिलेले युवा प्रेरणा प्रतिष्ठाण आज शासनाला देखील प्रेरणादायी ठरत आहे. युवा पिडीतील हे सर्व सहकारी आपला वाढदिवस साजरा न करता त्याच पैशातून अनाथ मुलांना शिक्षण देत आहे. याहून अजून कोणतेही उदाहरण या सहकार्य पलीकडे मिळणे कठीण आहे. रविवार दिनांक २३ मे २०२१ रोजी खास श्री. यश माने यांच्या वाढदिवसा निमित्त नालासोपारा येथे रस्त्यावरील निराधार नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्या वेळी बोलताना श्री. यश माने म्हणाले की, माझे व माझ्या युवा प्रेरणा प्रतिष्ठाणचे संपूर्ण जीवन मी ही जनसेवा करत राहणार आहे. आणि खास करून या सेवेसाठी माझ्या सर्व सहकारी वर्गाचे मी आभार मानतो कारण हे निस्वार्थी सहकारी मिळाले नसते तर मी आज ही जनसेवा करू शकलो नसतो त्या मुळे याचे व या सेवेचे संपूर्ण श्रेय माझ्या सहकारी वर्गाला जात आहे अशीच सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू असे आश्वासनही यानिमिताने दिले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...