महाराष्ट्रात नवीन कोरोनाबाधीत रुग्णसंख्या आटोक्यात !
मुंबई : आज दिवसभरात महाराष्ट्रामध्ये 26 हजार 672 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात तब्बल 29 हजार 177 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात सध्या 3 लाख 48 हजार 395 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर आज राज्यात 594 कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.59 टक्के एवढा आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असताना पाहायला मिळत आहे. असाच आकडा कमी होत राहिल्यास महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 51 लाख 40 हजार 272 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे महाराष्ट्रात हळूहळू रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment