Saturday 29 May 2021

भिवंडीत शिवसेनेला मोठं खिंडार; सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा पक्ष व जिप सदस्यत्वाचा राजीनामा.!

भिवंडीत शिवसेनेला मोठं खिंडार; सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा पक्ष व जिप सदस्यत्वाचा राजीनामा.!


अरुण पाटील, भिवंडी :
          भिवंडी तालुक्यात सर्वपरिचीत असलेले सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा ) हे धडाडीचे नेतृत्व, मात्र सुरेश म्हात्रे यांनी यापूर्वीही काही कारणास्तव शिवसेनेला रामराम ठोकला होता. नंतर बाळ्या मामानी पुन्हा सेनेत प्रवेश केला. तेंव्हा पक्षश्रेष्टीनी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत  सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना तब्बल दोन वर्षे कोणतीही जबाबदारी " न ". देता त्यांना शिवसैनिक म्हणून वागणूक दिली. सेनेच्या या वागणुकीमुळे बाळ्या मामा यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती.


         त्या कारणाने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह ठाणे जिप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे शनिवारी दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे. बाळ्या मामा यांनी आपले वैयक्तिक कारण पुढे करत शिवसेना सदस्यत्वाचा आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे . 
            विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बाळ्या मामा यांच्या घरी आले होते. तेव्हा पासूनच बाळ्या मामा हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता बाळ्या मामा यांनी आपला राजीनामा दिल्यामुळे ते काँग्रेस सोबत घरोबा करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यासह जिल्ह्यात सुरु आहे. त्याचबरोबर आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच बाळ्या मामा यांनी हा राजीनामा दिला असल्याचेही बोलले जात आहे. जर तसे झालेच तर येणाऱ्या २०२४ ची लोकसभेची निवडणूक‌‌ नक्कीच चुरशीची होणार आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठे खिंडार पडणार असल्याचे मत राजकीय विश्लेषना कडून बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...