Sunday 30 May 2021

भिवंडीत आगी लागण्याच्या घटना सुरूच पुन्हा मोती कारखान्याला भीषण आग.!

भिवंडीत आगी लागण्याच्या घटना सुरूच पुन्हा 
मोती कारखान्याला भीषण आग.!


अरुण पाटील, भिवंडी :
            भिवंडीत अग्नी तांडवच्या घटना वारंवार घडत आहेत. आता शहरातील नारायण कंपाऊंड येथे असलेल्या एका प्लॉस्टिक मोती कारखान्याला आग लागल्याचे समोर आले आहे. शनिवारी (29 मे) रात्रीच्या सुमारास ही भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोती कारखाना जाळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे हा मोती कारखाना नागरी वस्तीत दाटीवाटीच्या परिसरात असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरल
     या भीषण आगीत कंपनीतील साठा व मशीन्स जळून खाक झाल्या आहेत. तसेच या मोती कारखान्यात केमिकलयुक्त ज्वलनशील पदार्थ, प्लॉस्टिक दाना, व  दाण्यापासून तयार करून ठेवलेला माल याचा साठा होता. त्यामुळे आग लागताच काही क्षणातच कारखान्यात आगीने रौद्र रूप धारण केले, त्यात  संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. विशेष म्हणजे मोती कारखान्यात यावेळी कामगारही काम करीत होते. आगीची घटना समजताच सर्व कामगारांनी कारखान्याबाहेर पळ काढला. त्यामुळे
जीवितहानी कोणालाही दुखापत झालेली नाही.
        आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या  2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 तास अथक प्रयत्न केले. त्यानंतर आग आटोक्यात आली. सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सुरु आहे. आगीचे कारण अध्यापही समजू शकले नाही. या आगीत लाखो रुपयांचा मोत्यांचा साठा व मशीन्स जळून खाक झाल्या. या आगीमुळे परिसरातील नागरीवस्तीत धुराचे लोट पसरले होते.
          भिवंडीतील अग्नीतांडव थांबणार कधी?भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमध्ये बेकायदेशीर मोती कारखाने आहेत. या गोदामांमध्ये अत्यंत ज्वलनशील असे अति धोकादायक केमिकल व साहित्य असलेला साठा केला जातो. या साठ्यांना वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. 4 वर्षांपूर्वीही याच परिसरातील एका मोती कारखान्याला आग लागली होती. यात २ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यावेळी पालिका प्रशासनाने शहरातील मोती कारखाने बंद करण्याचे फर्मान काढून संबंधित कारखाना मालकांना नोटिसी बजावल्या होत्या.
       मात्र पालिकेची ती कारवाई कागदावरच राहिल्याचे दिसून आले. तर 2 वर्षांपूर्वी भिवंडी-ठाणे महामार्गावरील राहनाळ येथे लाकडाच्या वखारीला आग लागली होती. त्यामुळे येथे झोपेत असलेल्या ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये दापोडा येथे लागलेल्या आगीत ३ कामगार होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
        भिवंडीतील यंत्रमाग कारखाने व गोदामांना वारंवार आगी लागण्याचे सत्र सुरुच आहे. त्यात आज मोती कारखान्याला लागलेल्या आगीच्या निमित्ताने भिवंडीतील अग्नितांडव थांबणार कधी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष?भिवंडीत मोती कारख्यांनासह यंत्रमाग कारखाने, गोदामे, तसेच डाइंग व सायजिंग यांना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र, महापालिका व पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचेही या आगींच्या घटनांकडे पुरता दुर्लक्ष होत आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल निर्माण झाला

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...