लॉकडाऊन कायम ! रुग्णसंख्येत घट झालेल्या जिल्ह्यात निर्बंधांमधून दिलासा !!
मुंबई : राज्यातील कडक निर्बंध 15 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. रुग्णसंख्या कमी झालेल्या जिह्यांना मात्र निर्बंधांमधून दिलासा देण्यात आला आहे. तेथील आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. आवश्यक गटात नसलेली दुकाने उघडणे आणि त्यांच्या वेळा याचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोडण्यात आलेला आहे. शनिवार, रविवारी मात्र दुकाने बंद राहणार आहेत. याविषयीची नवी नियमावली सरकारने आज जाहीर केली.
दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, संभाजीनगर आणि नाशिक महानगरपालिकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येणार आहे.
रुग्णसंख्या कमी झालेल्या जिह्यांसाठी :
ज्या महानगरपालिका आणि जिह्यांमध्ये कोविड संसर्गाचा दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तसेच तेथील ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तिथे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
मॉल्स, शॉपिंग सेंटर्समधील दुकाने उघडण्यास मनाई.
आवश्यक वस्तूंच्यासोबत आवश्यक वर्गात नसलेल्या वस्तूंचे ऑनलाइन वितरण करता येणार.
दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा इतर अत्यावश्यक प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध.
शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहणार.
उपस्थिती वाढवण्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक
कृषिविषयक दुकाने कामाच्या दिवसांना दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहू शकणार.
पावसाळा, पेरणीच्या हंगामात त्यांच्या वेळा वाढवण्याचे तसेच शनिवार, रविवार सुरू ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्राधिकरणावर.
रुग्णसंख्या वाढलेल्या जिह्यांसाठी :
कोरोना पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त आणि एकूण ऑक्सिजन बेड्सपैकी 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील तर असे जिल्हे आणि पालिका क्षेत्रातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
जिह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करणार. कुणालाही आत-बाहेर जाण्यास मनाई
मृत्यू, वैद्यकीय कारण, आणीबाणी असेल तरच परवानगी
कोविड प्रसंगीची सेवा देणाऱया व्यक्तींना परवानगी
दुकानांना पुरवल्या जाणाऱया वस्तूंची वाहतूक कायम राहणार
दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना वस्तूंची विक्री करण्यास मनाई
नियम मोडणारी दुकाने कोरोना साथ संपेपर्यंत बंद ठेवावी लागणार आणि दुकानदाराला दंडही होणार.
No comments:
Post a Comment