Friday 28 May 2021

मुंबई - नासिक महामार्गा वरील तळवली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, स्थानिकांचा आरोप.!

मुंबई - नासिक महामार्गा वरील तळवली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, स्थानिकांचा आरोप.!


अरुण पाटील, भिवंडी :
           मुंबई - नाशिक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील भिवंडी तालुक्यातील तळवली नाका इथं उड्डाणं पुलाचे आणि दोन भुयारी मार्ग बनवण्याचे नियोजन करण्यात आले असून प्रथम या परिसरातील सर्व्हिस रोड बनवण्याचे काम सिगल इंडिया या कंपनीने घेतले आहे. मात्र सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असून मुरूम, माती न टाकता फक्त रॅबिट, कचरा आणि दगड टाकण्यात आले असून पाणी मारणे आवश्यक असताना देखील पाणी मारण्यात येत नसल्याने सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांन कडून होत असून भविष्यात सदर  रस्ता ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या मुळे या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासने जातीने लक्ष घालणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांन कडून बोलले जात आहे.
         भिवंडी - कल्याण रोडला जोडणारा तळवली सर्कल महत्वाचा असून या मार्गांवरून नाशिक, कल्याण, खोपोली, पुणे या ठिकानाहून  दररोज हजारो वाहने ये -जा करत असतात. या महामार्गावार सुरु असलेल्या कामाकडे  प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे तळवली नाका येथील सर्व्हिस  रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे जि काम करणाऱ्या सिगल इंडिया कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे..
      मुंबई - नाशिक महामार्गाचे काम चांगल्या प्रतीचे होण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे चांगल्या दर्जाचे काम करणे आवश्यक आहे मात्र तळवली नाका येथील सर्व्हिस रोडच्या कामासाठी चक्क रॅबिट, दगड आणि कचऱ्याची भरणी करण्याचा धक्कादायक प्रकार सिगल इंडिया कंपनी कडून करण्यात येत आहे वास्तविक मुरूम आणि मातीचा भराव करून त्यावर पाणी मारून रोलर फिरवणे गरजेचे असताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून शासनाची दिशाभूल करून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत आहे मात्र महामार्ग प्रशासन या कामा बाबत झोपेचे सोंग घेऊन गप्प बसले आहे..
        तळवली नाका येथील सर्व्हिस रोडचे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने महामार्ग प्रशासने संबंधित सिगल इंडिया कंपनीवर कारवाई करणे आवश्यक आहे कारण काही दिवसाने याच ठिकाणी उड्डाणं पूलाचे आणि भुयारी मार्ग बनवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे  जर सर्व्हिस रोडचेच काम निकृष्ट दर्जाचे होत असताना देखील संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर नियोजित उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग सुद्धा निकृष्ट दर्जाचे बनवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होण्याची समभावना आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने वेळीच सर्व्हिस रोडचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम थांबवून सदर बांधकाम करणाऱ्या सिगल इंडिया कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे, या संदर्भात महामार्ग प्रशासनातील टेक्निकल मॅनेजर दिलीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी करू असे सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...