Friday, 28 May 2021

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पुष्पा गणेश बोऱ्हाडे पाटील यांची बिनविरोध निवड !

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पुष्पा गणेश बोऱ्हाडे पाटील यांची बिनविरोध निवड !


अरुण पाटील, भिवंडी :
         ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पुष्पा गणेश बोऱ्हाडे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. नियोजन भवन सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, ठाणे अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) तथा सभा सचिव अजिंक्य पवार हे उपस्थित होते.
         या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने या पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, ठाणे अविनाश शिंदे यांनी घोषित केले. ही प्रक्रिया पार पाडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्ष पुष्पा गणेश बोऱ्हाडे पाटील या अंबरनाथ तालुक्यातील चरगाव गटातून जिल्हा परिषदेवर निवडुन आल्या आहेत. याप्रसंगी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेचे विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !!

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !! आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकड, मागणं, किंवा भेट घेण्यसाठी अनेक जन ...