Thursday 27 May 2021

राज्यात लॉकडाऊन कायम; निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा !

राज्यात लॉकडाऊन कायम; निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा !


मुंबई : मुंबईसह राज्याच्या शहरी भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागातील कोरोना रुग्णवाढ चिंताजनक आहे. त्यामुळे सध्या लागू असलेला लॉकडाऊन कायम ठेवून निर्बंध शिथिल करण्याबाबत गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. लॉकडाऊनचा कालावधी वाढवताना नेमके कोणते निर्बंध शिथिल करायचे याबाबत टास्कफोर्सशी चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सध्या लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत येत्या १ जून रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली.
निर्बंध शिथिल करताना सध्या दुकानांना दिलेल्या वेळेत आणखी वाढ करायची का, अन्य दुकानांना मुभा द्यायची का यावर येत्या दोन-तीन दिवसात बारकाईने अभ्यास होऊन निर्णय होईल, असेही टोपे यांनी सांगितले. दरम्यान राज्यात रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शिवाय म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढतो आहे. एकदम लॉकडाऊन न उठवता तो १ जूननंतर वाढवून मग हळूहळू टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादृष्टीने विभागास निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

1 comment:

  1. क्लास च्या बाबतीत काय निर्णय घेनार आहात की नाही

    ReplyDelete

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...