क्रीडा संस्थाकडून गोररिब व गरजूंना अन्नधान्य वाटप !!
कल्याण :- येथील शिवशौर्य फाउंडेशन च्या वतीने कौशल्य नगर मोहटा देवी मंदिर उल्हासनगर 3 येथील बुद्ध विहार याच्या आजूबाजूच्या गोरगरिबांना आणि गरजू लोकांना श्री संदीप ओंबासे सचिव - टायकोंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या हस्ते लॉकडॉन च्या काळापासून दुसऱ्यांदा अन्यधान्य वाटप रविवार 30/5/2021 रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी युथ ऑफ टुडेज अमु चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब कल्याण यांचाही सहभाग होता कौशल नगरात शंभर कुटुंबांना हे धान्य एक महिना पुरेल असा किट वाटण्यात आले ज्यामध्ये तांदूळ, डाळ, तिखट, मीठ, तेल, पीठ याचाच समवेश होता.
हे कार्य करण्यासाठी जय जाधव, स्वप्निल ओंबासे, राजेश मानवडे, ग्रंथाली कराडकर, दीपक बडवणे, कमल सोनवणे, ईश्वर सोनवणे, तेजस माणगावकर, वैभव पवार, उमेश मैत्रे, नरेश बाविस्कर, करण पवार, सागर सुरवाडे, श्वेता देवनळे, प्रणाली गायकवाड, कमलेश अहिरे व सुदर्शन दुधाणे याचे सहकार्य लाभले..
No comments:
Post a Comment