Monday, 31 May 2021

आजपासून कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेत लॉकडाऊन शिथिल !

आजपासून कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेत लॉकडाऊन शिथिल !


कल्याण: राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अतर्गंत राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. १ जून ते १५ जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. राज्यातील लॉकडाऊन एकदम न उठवता टप्प्या टप्प्याने उठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यापद्धतीने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जीवनावश्यक आणि इतर दुकानांच्या वेळांसाठी महापालिकेकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

दुकानांच्या वेळांसाठी नवीन नियम :

1) सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.

2) अत्यावश्यक वस्तू वितरणासोबत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचे वितरण ई कॉमर्स (ऑनलाइन पध्दतीने) करता येईल.

3) दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध असणार.

4) कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. यापेक्षा अधिक उपस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मंजुरी देईल.

5) कृषी विषयक दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यँत सुरू राहतील.

6) दुपारी 2 नंतर दुकाने आणि कार्यालयात माल वाहतुकीद्वारे वितरण करण्यासाठी मुभा राहील. त्यामुळे 2 नंतर कोणत्याही दुकानात किंवा कार्यालयात ग्राहकांना थेट काउंटर विक्री करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारे दुकान-कार्यालयावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

7) अत्यावश्यक नसलेली केवळ इतर एकल दुकाने ( मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील.

8) अत्यावश्यक नसणारी सर्व दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहणार

9) यापूर्वी लागू केलेले इतर सर्व निर्बंध तसेच लागू राहतील.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...