Monday 31 May 2021

भिवंडीत सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जन्मठेपाची शिक्षा !

भिवंडीत सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जन्मठेपाची शिक्षा !


अरुण पाटील, भिवंडी :
          मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना १२ ऑक्टोबर २०१७ रोजी भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवजी नगर परिसरात पहाटेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर नारपोली पोलिसांनी मोठ्या भावाला आईच्या तक्ररीवरून अटक केली होती. शनिवारी या खुनाच्या गुन्ह्याची अंतिम सुनावणी होऊन जिल्हा प्रधान तथा जिल्हा सत्र वरिष्ठ न्यायधीश एस. आर. जोशी यांनी आरोपी मोठ्या भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
             सुनील माने (३२) असे शिक्षा ठोठावलेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. तर आकाश माने (१९) असे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे.भिवंडी शहरातील देवाजीनगर भागात कौशल्या माने आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना मयत  आकाश (१९) आणि सुनील (३२) अशी दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे लग्न झाले असून दोन नातवंडेही त्यांना आहेत. मृत आकाशला दारूचे व्यसन होते. तो नेहमी मोठा भाऊ सुनील याला शिविगाळ करत होता. तसेच त्याला मारहाणही करायचा. तो काहीही काम करत नव्हता. तसेच चोऱ्या करून नशेबाजी करीत असल्याने घरच्यांनी मृत आकाशला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला होता .
              मात्र तो कधीही व काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा .१२ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या रात्री घरी येऊन मयत आकाश आईकडे दारूसाठी ५०० रुपयांची मागणी केली. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तो घरातून बाहेर पडला.रात्री पुन्हा दारूच्या नशेत आकाश घरी आला मात्र, मोठा भाऊ सुनील याने त्याला दारू "न " पिण्याबाबत बजावले असता तेंव्हा त्याने भावाला शिवीगाळ केली. तसेच त्याच्याकडे देखील दोन हजार रुपयांची मागणी करून घरातून बाहेर पडला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा घरी आलेल्या मयत आकाशला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो जोरजोरात शिव्या देऊ लागल्याने याच रागातून मोठा भाऊ सुनीलने घरातील लाकडी दांडक्याने आकाशला मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. नंतर  आकाशला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
               तेंव्हा या प्रकरणात बाबबत  न्यायालयात १२ साक्षीदारांकडून साक्ष नारपोली पोलीस ठाण्याचे त्यावेळेचे पोलीस उपनिरीक्षक गोराडे  यांनी न्यायालयात वेळो वेळी आरोपी विरोधात पुरावे सादर केले. तर खुनाच्या सुनावणी दरम्यान जिल्हा न्यायालयाने १२ साक्षीदारांकडून साक्ष घेतली. तसेच सरकारी वकील म्हणून विवेक कडू यांनी काम पहिले. तर संपूर्ण कार्यवाहीत खटला चालविण्यास एच. सी. गौरवा पचेगावकर यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...