Monday 31 May 2021

रायते येथील उल्हास नदीवर तर दहागाव मधील बारवी वर पर्यटकांचा "कु" मेळा, कोरोना गर्दीत बुडून मेला?

रायते येथील उल्हास नदीवर तर दहागाव मधील बारवी वर पर्यटकांचा "कु" मेळा, कोरोना गर्दीत बुडून मेला?


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाची शहरापेक्षा ग्रामीण भागातील गंभीर स्थिती पाहून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढील पंधरा दिवसांचा लाॅकडाऊण वाढवला आहे. तसेच कोरोना मुक्त गाव ही संकल्पना राबविण्याचे अवाहन केले आहे. परंतु कल्याण ग्रामीण भागात येणाऱ्या रायते येथील उल्हास नदीत आणि दहागाव आंबेशिव दरम्यान च्या बारवी नदीत काल अक्षरशः कुंभ मेळा भरला होता. त्यामुळे येणारे जाणारे मिश्किल पणे या गर्दीकडे बघून, कोरोना पाण्यात बुडून मेला 'असे म्हणत होते.


कोरोनाच्या संकटामुळे राज्यात संचारबंदी लागू केली, शिवाय काही जिल्हात कडक लाॅकडाऊण लागू केला. परिस्थिती पाहून १५ /१५ दिवसांनी यामध्ये वाढ करण्यात आली होती. १जून पासून लाॅकडाऊण उठून निर्बंध शिथिल होईल असे प्रत्येकाला वाटत होते. लाॅकडाऊण चा फायदा असा झाला की कोरोना ची रुग्ण संख्या कमी झाली. तसेच कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण वाढले. परंतु दुसरे असे झाले की कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन आले, त्यातच मुक्यरमायसोसिस पेंशट वाढत आहेत. आणि तिसरी लाट आली तर ती लहान मुलांना घातक ठरू शकते असे तज्ञांनी मत व्यक्त केले होते. मे महिन्यातील कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे शहरी भागातील रुग्ण संख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागात ती वाढत आहेत अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १५ जून पर्यंत निर्बंध तसेच ठेवले आहेत. शिवाय ग्रामीण भागातील कोरोना पेंशट कमी होण्यासाठी काही जिल्हामध्ये कडक लाॅकडाऊण लागू करण्याचा इशारा दिला आहे. हे करित असताना त्यांनी "कोरोना मुक्त" ही संकल्पना राबविण्याचे अवाहन केले आहे. यामागे कोरोना मुक्त गाव, तालुका, जिल्हा आणि अखेर राज्य असा हेतू आहे. असे असताना काल म्हणजे रविवारी कल्याण तालुक्यातील रायते येथील उल्हास नदीच्या पात्रात तसेच दहागाव आणि आंबेशिव दरम्यान असलेल्या बारवी नदी पात्रात पर्यटक, रिकामटेकडे, आणि आवशे गवशे. नवशे यांची अक्षरशः यात्रा भरली होती. अगदी लहान मुलापासून ते तरुण, तरुणी, स्त्री पुरुष, अबालवृध्द, वयोवृद्ध यांचा समावेश होता 
ही दोन्ही ठिकाणे अगदी रस्त्याच्या बाजूला असल्याने येणारे जाणारे बघत, हसत, फोटो काढत, आणि मिश्किल पणे म्हणत, आता कोरोना गर्दीमुळे पाण्यात बुडून मेलाच म्हणून समजा! 

विशेष म्हणजे इतकी गर्दी असतानाही पोलीस "दादा" कुठेही दिसत नव्हते. 

त्यामुळे लाॅकडाऊण उठला की काय? अस असे कित्येकांना वाटत होते. पण अशीच परिस्थिती राहिली तर मात्र तिसरी लाट यायला वेळ लागणार नाही याचा प्रत्येकांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...