Monday, 24 May 2021

म्हारळ ग्रामपंचायतीची नालेसफाईची कामे अतिंम टप्प्यात, पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून करणार उपाययोजना !

म्हारळ ग्रामपंचायतीची नालेसफाईची कामे अतिंम टप्प्यात, पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून करणार उपाययोजना !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायती मधील मुख्य नाल्यासह इतर छोट्या मोठ्या अंतर्गत नाल्याची सफाई अतिम टप्प्यात आली असून यावेळी पावसाळ्यात सखल भागात पाणी साचू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील याचे नियोजन चालू आहे.


कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हणजे १७ सदस्य संख्या असलेल्या आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये पावसाळ्यात म्हारळ सोसायटी, आण्णासाहेब पाटील नगर, शिवानी नगर गोदावरी नगर आदी परिसरात पाणी भरते. ब-याच वेळी नाले तुंबल्याने पाणी जमा होते. त्यातच अनेकांनी नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे केल्याने नाल्याची लांबी रुंदी दिवसेंदिवस कमी झाली आहे. आणि अशात भर म्हणून की काय आता तयार झालेला कल्याण मुरबाड हा २२२ महामार्ग व गावातील मुख्य रस्ता हा सिमेंट काँक्रिटचे असल्याने आणि याची उंची अधिक असल्याने आता सोसायटी, गोदावरी नगर, शिवानी नगर, आण्णासाहेब पाटील नगर आदी भाग अधिक खाली गेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची डोकेदुखी वाढली आहे. म्हणून सरपंच श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे, उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख, सर्व  ग्रामपंचायत सदस्य , कल्याण पंचायत समितीचे सदस्य, झेडपी सदस्य यांच्या सूचनेनुसार गावातील मुख्य नाला सुर्यानगर ते २२२ महामार्ग असा सुमारे १हजार ते १५०० मीटर लांबीच्या नाल्याची साफसफाई प्राधान्याने सुरू केली आहे. पोकळन, जेसीबी, डंपर आणि मनुष्यबळ यांचा वापर करून सुमारे ४/५ टन कचरा दररोज काढून तो डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. याशिवाय प्रत्येक वार्डातील छोटे मोठे अंतर्गत असे हजार ते बाराशे नाल्यांची सफाई देखील सुरू केली आहे. तसेच जिथे शक्य आहे, पाणी भरते तिथे भूमिगत गटार योजना राबविण्याचा विचार ग्रामपंचायत करित असल्याचे सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे यांनी सांगितले. तर जनतेने नाल्यात गाद्या, उश्या, प्लास्टिकच्या पिशव्या, इतर वस्तू टाकू नये असे अवाहन उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख यांनी केले आहे. त्यामुळे या पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांचे नुकसान होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करुया. 

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...