मुलींना कोणीही त्रास देत असल्यास भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी - पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांचे आवाहन
लैंगिक शोषण असो की अन्य कोणीही त्रास देत असल्यास मुली व महिलांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन वाडा पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी केले आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवसानिमित्त "जनविश्वास सप्ताह" साजरा करण्यात येत असून या अंतर्गत पालघर जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रोहिणीताई शेलार यांच्यावतीने वाडा तालुक्यातील परळी आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना दत्तात्रेय किंद्रे यांनी महिला कायदे व सायबर क्राईम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने परळी येथे वृक्षारोपण उपक्रमही राबविण्यात आला.
यावेळी महिला राष्ट्रवादीच्या उपजिल्हाध्यक्षा चित्रा ताई पाटील, वाडा तालुका सचिव रंजनाताई भागडे, परळी गावच्या सरपंच सौ. वैशालीताई पवार तसेच पंचायत समिती माजी सभापती रघुनाथ माली, पोलीस पाटील बबन पाटील, परळी माजी उपसरपंच रुपेश दत्तू पाटील, परळी आश्रम शाळेतील सर्व महिला शिक्षिका व शिक्षक वर्ग सर्व उपस्थित होते.
वृत्तांत - जयेश शेलार
जेष्ठ पत्रकार / संपादक/ वाडा तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस)
No comments:
Post a Comment