मुरबाड मधील शेतकर्यांसाठी साठी लढा देण्यास मी सज्ज !! **माजी आमदार गोटीरामभाऊ पवार**
मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी हमीभावात विकलेल्या भाताचे पैसे आतापर्यंत मिळाले नाही. तसेच २५ मार्च २०२५ पर्यंत जर शेतकऱ्यांचे पैसे मिळाले असते, तर त्या शेतकऱ्यांना बँकेमध्ये आपले पैसे भरता आले असते,, परंतु सरकारने पैसे देण्यास मोठ्या प्रमाणात विलंब केल्याने त्या शेतकऱ्यांना सेवा सहकारी सोसायटी मार्फत घेतलेले कर्ज वेळेवर भरता आले नाही, त्यामुळे त्यांना थकीबाकी म्हणून राहावं लागलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरला पाहिजे, तसेच त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे लढायला सज्ज आहे. असा विश्वास लोकनेते तथा माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी विद्या मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिवले संकुलातील सभागृहात २० जुलै २०२५ रोजी आयोजित केलेल्या कार्यकर्ता व स्नेहभोजन मेळाव्यात केले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार गोटीरामभाऊ पवार, ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, माजी सभापती कमलाकर भोईर, ह. भ. प. रामभाऊ दळवी, बाजार समिती सभापती बालकृष्ण चौधरी, ठाणे जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पवार, किसन गिरा, रवींद्र चंदणे, लक्ष्मण भगत, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश पवार, रवींद्र टेंबे, चंद्रकांत गायकर वसंत गायकर, दिपक वाघचौरे, जिल्हा परिषद माजी सदस्य प्राजक्ता भावथे॔, दिपा भला, पदमा पवार अनिल देसले, रमेश जाधव, प्रकाश व्यापारी, रमेश तुंगार, महिला संघटक रेखा इसामे, महिला सरपंच, उपसरपंच, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन, सेवा सोसायटीचे चेअरमन/ व्हाईस चेअरमन, सरपंच /उपसरपंच तालुक्यातील तळागाळातील महिलावर्ग तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,.
तर ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी कार्यकर्त्यांना मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपण विधानसभेची निवडणूक लढलो आणि हरलो, यापेक्षा आपल्याला मिळालेले मताधिक्य हे फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा आपण या तालुक्यातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहोत .तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात कामाला लागा, गावातील सर्वांना घेऊन एकत्र बसा ज्या काही छोट्या-मोठ्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच आपण आज कोणत्या पक्षात गेलो नाही. परंतु तुम्ही जे म्हणता आपला पक्ष म्हणजे माजी आमदार गोटीरामभाऊ पवार होय, खरच आहे त्याचप्रमाणे आपण काम करूया भविष्यात पुढचा निर्णय काय घ्यायचा तो आपण सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ या.
तसेच माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी बोलताना सांगितले की तालुक्यामध्ये खरेदी-विक्री संघावर जे काही प्रशासक मंडळ नेमला आहे पण नेमलेला प्रशासक मंडल हा मागच्या दारातला आहे, त्यांना आपण एक महिन्याच्या आत मागच्या दारात घरी पाठवू असा इशारा माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी दिला आहे. त्याचबरोबर अनेक समस्या उद्भवल्या असल्या तरी त्या आपण सर्व एकत्र बसून सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच विधानसभेमध्ये ज्या काही तालुक्यातल्या प्रलंबित समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी एकही शब्द विधानसभेत काढताना दिसत नाही अशी खंत गोटीरामभाऊ पवार यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पवार यांनी केले तर सूत्रसंचालन हिंदुराव यांनी केले.
No comments:
Post a Comment