Monday, 21 July 2025

कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने न्हावे सासणे गावायला मिळाले दर्जेदार ग्राम सचिवालय !!

कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने न्हावे सासणे गावायला मिळाले दर्जेदार ग्राम सचिवालय !!

**थाटामाटात संपन्न झाला उद्घाटन सोहळा**

मुरबाड, { मंगल डोंगरे } :-  तालुक्यातील मुरबाड - कर्जत या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या न्हावे - सासणे या गावातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात यशस्वी ठरलेले सरपंच जगदीश हिंदुराव, उपसरपंच शशांक हिंदुराव यांचे विशेष प्रयत्नांनी तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने न्हावे सासणे गावाला प्रशस्त असे ग्राम सचिवालय मिळाल्याने त्या नुतन सचिवालयाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचे शुभहस्ते  थाटामाटात संपन्न झाले .त्याप्रसंगी बाळकृष्ण हिंदुराव, वाळकु हिंदुराव, संजय जाधव, यांचेसह गावातील सर्व समाजातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. 

मुरबाड कर्जत पुणे या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या न्हावे सासणे गावात सर्व समाजाचे लोक वास्तव्य करीत असल्याने गावात सुसज्ज असे रस्ते, गटारे असल्याने गाव सांडपाण्या पासुन मुक्त असुन स्वच्छता अभियानात अग्रेसर आहे. तसेच अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालयाच्या च्या  भव्य दिव्य इमारती आहेत, शिवाय गावातील प्रत्येक  समाजासाठी घरकुल योजना राबविण्यात आली असुन, संपूर्ण गाव सध्या एक प्रकारे निवारा मुक्त झाला आहे. प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र समाज हाॅल अशा विविध सुविधांनी गाव नटलेला असल्याने संपूर्ण गावची ओळख दाखविणारे ग्राम सचिवालयाची मोठी समस्या होती.त्यासाठी आमदार किसन कथोरे यांचे प्रयत्नाने ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध झाला आणि सरपंच उपसरपंच यांनी भव्यदिव्य असे ग्राम सचिवालयाची उभारणी केली. त्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

**** गावातील ग्रामस्थांना 'मोफत वाय फाय सुविधा' पुरविण्यासाठी तसेच सुरळीतपणे विज पुरवठा मिळण्यासाठी गावातील विजेचे जुने पोल आणि तारा बदलण्यासाठी ग्रामपंचायत चा पाठपुरावा सुरू आहे.ते काम लवकरच पूर्ण होईल - मनोहर हिंदुराव.सरपंच न्हावे सासणे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...