कल्याण तालुक्यातील कोलम गावात आदिवासी बांधव व पत्रकारांना अन्नधान्य किट वाटप, युवा मंचचा पुढाकार!
कल्याण, (संजय कांबळे) : जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुध्द पौर्णिमेचे औचित्य साधून सामाजिक महिला कार्यकर्त्या मनिषा जाधव यानी कोलम गावात आदिवासी बांधव व कल्याण तालुक्यातील पत्रकारांना अन्नधान्य किट वाटप केले पतीच्या ६ व्या स्मृतिदिननिमित्त जपली सामाजिक बांधिलकी जपत भरत दळवी युवा विकास मंचच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील मालशेज- नगर या राष्ट्रीय महामार्गानजीक वसलेल्या कोलम गावात तथागत भगवान गौतम बुद्ध बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधुन गणेश पार्क टिटवाला येथे राहणाऱ्या सामाजिक महिला कार्यकर्त्या मनीषा जाधव यानी आपले पती दिवंगत प्रताप जाधव यांच्या ६ व्या स्मृतिदिननिमित्त भरत दळवी युवा विकास मंचच्या माध्यमातून येथील आदिवासी बांधव व कल्याण तालुक्यातील पत्रकार यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक मदतीचा हात म्हणून अन्नधान्य कीट वाटप केले.
कोविड-१९ या आजाराच्या कालावधीत अन्नधान्याचे साहित्य वाटप करून तथागत बुद्धांचे तत्त्वज्ञानानुसार गोरगरिबांना केलेली मदत ही खऱ्या अर्थाने बुद्धपौर्णिमा साजरी केल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली. यावेळी कोलम गावच्या सरपंच प्रिती राऊत, महिला कार्यकर्त्या लतिका राऊत, गुरुकुल योगा बाग संस्कार संस्थेचे अध्यक्ष रवि शर्मा, श्वेता जाधव, सुमेश जाधव, यश गायकवाड़, कोलम येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष राऊत, महिला कार्यकर्त्या सुनंदा राऊत, कल्पना राऊत, अनुसया राऊत, कमलाकर राऊत, जेष्ठ पत्रकार संजय कांबळे, साप्ताहिक ठाणे अरुणोदयचे प्रतिनिधी एकनाथ सोनावणे, आदी उपस्थित होते, तसेच सदर उपक्रम राबविण्याची संकल्पना व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत दळवी युवा मंचचे अध्यक्ष भरत दळवी सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद राऊत, रोहित राऊत, पवन चोरघे, यश राऊत यानी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी हरी ओम किराणा स्टोअर्सचे मालक संतोष राऊत यानी मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच कोरोनाच्या महामारीत जीव धोक्यात घालून लोक शिक्षण व लोक जागृती करणा-या पत्रकारांच्या पाठिशी भक्कम पणे व संपुर्ण ताकदिसह उभे राह्याला हवे असे मत अध्यक्ष भरत दळवी यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment