Friday 22 March 2024

पोस्को कंपनीत जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. राहुल मुनगीकर यांचे पर्यावरण आणि जैवविविधता विषयावर मार्गदर्शन !!

पोस्को कंपनीत जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. राहुल मुनगीकर यांचे पर्यावरण आणि जैवविविधता विषयावर मार्गदर्शन !!

       बोरघर /माणगाव ( विश्वास गायकवाड ) : पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी सीएसआर फंड सामाजिक विनियोग या अनुषंगाने माणगाव पत्रकारां समवेत त्रैमासिक चर्चा सत्र तथा परिसंवाद शुक्रवार दिनांक २२ मार्च रोजी पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी च्या कॉन्फरन्स हॉल तथा परिसंवाद कक्षात संपन्न झाला. सदर परिसंवाद कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून जागतिक जल दिनाचे औचित्य साधून डॉ राहुल रमेश मुनगीकर ( पर्यावरण आणि जैवविविधता या विषयाचे गाढे अभासक आणि संशोधक ) यांचे पर्यावरण, जैवविविधता, पर्यावरण प्रदूषण, जलप्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, जंगल तोड आणि मानव निर्मित वणवे आणि पर्यावरणाची हानी इत्यादी महत्वपूर्ण गंभीर विषयांवर मौलिक मार्गदर्शन आयोजित केले होते. 
       सदर चर्चा सत्र परिसंवाद कार्यक्रमात सर्व प्रथम पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी व्यवस्थापकीय मंडळाकडून विषेशतः मा. पाटील सर, मा. पुरंदरे सर आणि मा. महेंद्र थिटे सर यांनी पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी च्या माध्यमातून सीएसआर फंडाचा कंपनी व्यवस्थापनाने सामाजिक उत्तरदायित्त्व या उदात्त भावनेतून शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका या मुलभूत बाबींवर सामाजिक उत्थानासाठी केलेल्या आर्थिक विनियोगाची माहिती पत्रकारांना दिली. 
      या नंतर पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी व्यवस्थापनाने पर्यावरण आणि जैवविविधता या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केलेले पर्यावरण आणि जैवविविधता या विषयावर संशोधनात्मक पीएच डी करणारे संशोधक माननीय डॉ. राहुल रमेश मुनगीकर यांनी उपरोक्त विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले. त्याच बरोबर पर्यावरणाचे रक्षण व जैवविविधता संवर्धन आणि आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य या संदर्भात जाणीव जागृती केली. 
    या नंतर जागतिक जल दिन या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन जागतिक जल दिना निमित्ताने माणगाव पत्रकारांनी डॉ राहुल रमेश मुनगीकर यांची बाईट तथा मुलाखत घेतली. या बाईट मुलाखती मध्ये पत्रकारांनी डॉ मुनगीकर यांना जागतिक जल दिन आणि जल प्रदूषण, मानवी दैनंदिन जीवनातील प्लास्टिक चा बेसुमार वापर मानवी जीवनाला, पर्यावरणाला, जल प्रदूषणाला हानीकारक तसेच मानवनिर्मित वणवे, ग्लोबल वॉर्मिंग तथा जागतिक तापमानवाढ, बेसुमार वृक्ष तोड, सांस्कृतिक होळी उत्सव आणि वृक्ष तोड, अवर्षण, प्रवर्षण, पूर स्थिती आणि दुष्काळ या बाबत चर्चात्मक परिसंवाद साधला.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...