Friday 22 March 2024

जन्मशताब्दी वर्षी वै.ह.भ.प विठोबा आण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराचे वितरण !!

जन्मशताब्दी वर्षी वै.ह.भ.प विठोबा आण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराचे वितरण !!

***** पाच निवडक सामाजिक कार्यकर्त्यांचा होणार गौरव

मुंबई, (शांताराम गुडेकर) -

          स्वातंत्र्यसेनानी आणि तत्कालीन कुलाबा जिल्हा कृषी सभापती वै.ह.भ.प विठोबा आण्णा सुभनराव मालुसरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळवार दि.२६ मार्च २०२४ रोजी पोलादपूर तालुका साखर खडकवाडी येथे वसा समजासेवेचा सन्मान कर्तृत्वाचा या आधारे समाजात कार्यरत असणाऱ्या मुंबईसह तालुक्यातील पाच निवडक सामाजिक कार्यकर्त्यांचा वै.हभप विठोबाआण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याचे मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
           महाराष्ट्रातील वारकरी परंपरा तसेच कीर्तन, प्रवचनाचा वारसा पुढे अखंड चालू रहावा आणि समाजाला प्रबोधन व्हावे यासाठी वै.हभप विठोबाआण्णा मालुसरे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवरील कीर्तन सोहळ्यात हजेरी लावून कार्यक्रमाना उत्तेजीत केले होते. जन्मशताब्दी ची सुरुवात करताना तालुक्यातील गायनाचार्य, मृदुंगाचार्य यांच्या उपस्थितीत भव्य सुस्वर भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून मुंबई आणि तालुक्यातील सामाजिक कार्य कारणाऱ्या  पाच निवडक कार्यकर्त्याचा पुरस्कार प्रदान करून होणार आहे. कृष्णा कदम ( के के ) - ओंबली, सुभाष जाधव - खडकवाडी , गोविंद चोरगे- साखर, महेश मालुसरे - मुळशी पुणे, निलेश कोळ सकर- देवळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांची अवहेलना !! पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रत्येक घडामोडींचे...