Thursday 21 March 2024

मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दबंगे व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्यासाठी अखंड बेमुदत उपोषण !!

मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दबंगे व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्यासाठी अखंड बेमुदत उपोषण !!

नाशिक, प्रतिनिधी : नाशिक येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दबंगे तसेच त्यांचे सहकारी दुय्यम निबंधक प्रविण चौधरी व अन्य दोन यांच्या वर कार्यालयातील एका महिलेने जातीवाचक बोलणे, अश्लील शब्द वापरणे व सुट्टीच्या दिवशी जाणूनबुजून कामावर बोलविणे तसेच शरीरसुखाची मागणी करणे असे आरोप केले. 

सदर प्रकरणात उपनगर पोलिस स्टेशन, नाशिक येथे अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ प्रमाणे ३(I), (r), (s), (w), (i), (ii), तसेच भा.दं.वि १८६० प्रमाणे ३५४, ३५४- अ, ३५४- ड, ५०४, ५०६, ३४ विनयभंग व ॲट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दबंगे यांनी अनेक गैरव्यवहार केले असून त्या महिलेवर झालेल्या अन्याय सहन केला जाणार नाही असे बहुजन विकास परिषद, महाराष्ट्र यांचे कार्याध्यक्ष सुर्यकांत चिंतामण भालेराव यांनी सांगितले, तसेच कैलास दबंगे यांची SIT चौकशी करावी व त्यांना तात्काळ अटक करावी यासाठी बेमुदत अखंड साखळी उपोषण २० मार्च २०२४ सुरू केले आहे.

सदर उपोषण काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला किंवा उपोषणकर्ते यांच्या जिवितास धोका निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी १) मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दबंगे, २) दुय्यम निबंधक प्रविण चौधरी, ३) देविदास कोल्हे (एस. टू. कंपनीचा इंजिनिअर), ४) सागर बच्छाव (दुय्यम निबंधक), ५) अजय पवार (सिन्नर दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी), ६) सौ. स्वाती कैलास दबंगे (कैलास दबंगे यांच्या पत्नी) हे जबाबदार रहातील, अशा अर्ज त्यांनी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना केला आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...