Tuesday 19 March 2024

** खरा आनंद __ संत राजिंदर सिंह महाराज''''

** खरा आनंद __ संत राजिंदर सिंह महाराज'''' 

सृष्टीच्या सुरुवातीपासूनच मानवाचा हा प्रयत्न आहे की, त्याने आपल्या जीवनात आनंदाने जगावे म्हणून तो अशीच कृती करण्याचा प्रयत्न करतो कि, ज्यामुळे त्याला असे वाटते कि त्याला आनंद मिळेल.

आपल्या पैकी बरेचसे लोक असा विचार करतात की, जेव्हा आपले शरीर सुदृढ असेल, आपल्याजवळ भरपूर पैसा असेल, आपले नातेसंबंध चांगले असतील, एक मोठे घर असेल आणि एक यशस्वी कारकीर्द असेल, तेव्हा आपल्याला खुशी प्राप्त होईल. याकरिता त्याचा असा प्रयत्न असतो की, संसारात काही तरी व्हावे, आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले राहावे, आपण नावलौकिक कमवावा, धन-दौलत कमवावी, आपले कुटुंबीय व नातेसंबंध चांगल्या प्रकारे निभवावे, या सर्व भौतिक सुखांना प्राप्त करण्यात आपला अमूल्य वेळ या कार्यात खर्च करतो.

आपल्यापैकी बरेचसे लोक स्वतःला शरीर आणि मन समजतात. आपण आपला सर्व वेळ शारीरिक गरजा उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा यांच्या पूर्ती करिता आणि त्याला आराम देण्याकरिता विविध प्रकारच्या खुशी इत्यादींमध्ये व्यतीत करतो. याच बरोबर आपण आपल्या बौद्धिक विकासाकरिता आपला बराचसा वेळ एक चांगलं शिक्षण प्राप्त करण्यात घालवितो. ज्याद्वारे, आपण एक सोनेरी उज्वल भविष्य बनवून या जगात नावलौकिक आणि धन-दौलत कमवू शकू.

आपण जर लक्षपूर्वक पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की, या जगात शारीरिक, मानसिक, बौद्धिक खुशी प्राप्त करीत असताना, आपल्याला अशी भीती वाटत असते की आपण ही यांच्यातच कायमचे गुरफटून जाऊ. यांच्यातले कोणतेही सुख कायमस्वरूपी नाही कारण की या जगातील प्रत्येक वस्तू नाशवान आहे. अशा परिस्थितीत आपण असा विचार करतो की, असे कोणते सुख आहे कि जे सदैव आपल्या बरोबरच राहील. तेव्हा आपले लक्ष आपल्या धर्मग्रंथांकडे व त्यांच्या शिकवणुकीकडे जाते.

महापुरुष आपल्याला समजावितात की आपणास खरे सुख प्राप्त करायचे असेल तर, ते बाह्य जगात नसून ते आपल्या अंतरीच आहे. त्याकरिता आपल्याला आपले लक्ष बाह्य दुनियेच्या आकर्षणा पासून हटवून आपल्या आत्म्याकडे लावलं पाहिजे. आपल्याला हे शाश्वत सुख प्राप्त करण्यासाठी कोणत्या एखाद्या पूर्ण महापुरुषाच्या चरणकमली जावे लागेल आणि त्यांच्या कडून ध्यान-अभ्यासाची विधि शिकून त्याला आपल्या जीवनाचा भाग बनविता यावा.

जसजसे ध्यान-अभ्यासाला आपण नियमितपणे वेळ देऊ लागतो, आपण आपल्या अंतरी प्रभूच्या ज्योती आणि श्रुतीशी जोडले जाऊन, खरी खुशी अनुभवू शकतो, ज्यामुळे आपला या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला जातो.
ध्यान-अभ्यासाद्वारे आपण प्रभुशी एकरूप होऊ शकतो आणि सदैव टिकणारी खुशी प्राप्त करतो. ध्यान-अभ्यासाची ही विधि प्रत्येक माणूस करू शकतो. भले तो लहान बालक असो वा वृद्ध. बालवयापासूनच ध्यान एकाग्र करण्यास शिकले पाहिजे, ज्यामुळे ही एक चांगली सवय जडेल.

जे लोक ध्यान एकाग्र करण्यास शिकतात, ते आपलं लक्ष संसारिक चिंतेतून हटवून अंतरी असलेल्या आनंदाशी जोडण्यास शिकतात आणि आपल्या अंतःकरणात कायम राहणाऱ्या आनंदाचे अनुभव करतात.

आपण दैनंदिन जीवनाच्या जबाबदाऱ्या निभवत असतानासुद्धा ती खुशी आपल्या बरोबरच असते. जेव्हा आपण कामावर जातो, भले आपण वर्दळी मध्ये गाडी चालविताना अथवा बाजारहाट करताना, मुलांचे संगोपन करताना, दिवस-रात्र, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी ही खुशी आपल्याबरोबर असते. ध्यान-अभ्यास करण्याचा मोठा फायदा असा की जेव्हा आपल्या अंतरी प्रभूच्या दिव्य ज्योती आणि श्रुतीशी आपण जोडले जातो तेव्हा आपल्याला हा अनुभव होतो की प्रभूची शक्ती केवळ मनुष्यप्राण्यातच नव्हे तर सृष्टीतील सर्व जीव-जंतूंच्या आणि झाडा-झुडपात इत्यादींना सुद्धा जीवन देत असते.  तेव्हा आपल्या अंतरी सर्वांच्या प्रती प्रेम, अहिंसा आणि करुणेचा भाव उत्पन्न होतो. आपली इच्छा असते की त्यांचे ही जीवन खुशीने भरलेले राहो.

चला तर, आज विश्वभरात खुशीचा दिवस (International Day of Happiness) साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी आपण ध्यान-अभ्यासा करिता वेळ काढून आपल्या अंतरी असलेल्या शाश्वत खुशीचा अनूभव करूया आणि या विश्वात त्याचा प्रसार करूया.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...