"सिद्धार्थ महाविद्यालया"च्या विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय निरोप समारंभ संपन्न !!
मुंबई, डॉ विष्णू भंडारे -
सिद्धार्थ महाविद्यालयाच्या बीकॉम, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी एका अनोख्या पद्धतीने निरोप समारंभाचे (Farewel Program) आयोजन शनिवार, दि. २२/२/२०२५ रोजी कॉलेजच्या सभागृहात केले होते. कॉलेजमधील त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या मागील तीन वर्षाच्या कार्यकाळाचे हे अखेरचे वर्ष असल्याने, या फेअरवेलचे आयोजन विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने केले होते.
कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश एकत्र येऊन सामुदायिक नृत्य, गाणे इत्यादी मनोरंजनाच्या ईव्हेंटसह, शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा होता. ज्या शिक्षकांनी त्यांना पुस्तकी ज्ञानासह भविष्यातील ईतर आव्हानावर मात करून आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्र्वास दिला, त्यांचा अत्यंत आदरपूर्वक व विनम्रपणे एक सुंदर व अविस्मरणीय भेटवस्तू देऊन सन्मान केला.
एका ग्रिटींग कार्डवर १० रुपयाची ओरिजीनल नविकोरी नोट व त्यावरील सहा आकडी नंबर, जो भेटवस्तू दिलेल्या शिक्षकाची जन्मतारीख आहे (उदा. 080753), अशी सुंदर भेटवस्तू प्रत्येक शिक्षकाला देण्याची त्यांची भन्नाट कल्पना व अशा नोटा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यानी घेतलेल्या परिश्रमाने सर्व उपस्थित शिक्षक अक्षरशा भारावून गेले. त्यानंतर सर्वांसाठी उत्तम स्नेहभोजनाचे देखिल विद्यार्थ्यांनी आयोजन केले होते.
अलिकडच्या काळातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दल व ते करत असलेल्या विद्यादानाच्या पवित्र कामाबद्दल, विद्यार्थ्यांमध्ये आदर किंवा कृतज्ञताभाव, विशेषता ग्रामिण भाग वगळता शहरी भागातील विद्यार्थ्यामंध्ये क्वचितच आढळतो असे सभोवतालचे चित्र किंवा वातावरणातून जाणवते, मात्र आमचे विद्यार्थां निश्चितच याला अपवाद आहेत, ते वेगळे आहेत हे यानिमित्ताने सिद्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५३ साली स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयातील शिक्षकवृंदानी गेल्या ७८ वर्षाच्या प्रदीर्घ गुरू-शिष्य परंपरेच्या संस्काराचा सुंदर वारसा आजपर्यंत पुढे चालू ठेवल्याचे कदाचित हे फलीत असावे असे वाटते.
विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील या अनोख्या फेअरवेल समारंभासाठी प्राचार्य डॉ. यु. एम. मस्के सरांनी कॉलजकडून त्यांना अर्थसाहय्य केले व त्यांचे कौतूकही केले. तसेच कार्यक्रम यशस्विरित्या संपन्न होण्यासाठी उपप्राचार्य डॉ. समिर ठाकूर व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व हर्षद इंगळे यांच्या नेतृत्वात निखिल जाधव, प्रियंका बळकटे, ऋषिकेश धोबी, दामिनी बोबडे व यश सोनावणे या विद्यार्थ्यांनी मागिल दोन आठवड्यांपासून भरपूर मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment