Monday, 18 March 2024

इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काऊन्सिल तर्फे विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात महिला दिन संपन्न !!

इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काऊन्सिल तर्फे विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात महिला दिन संपन्न !!

वसई, प्रतिनिधी :

विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काऊन्सिलच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम नुकताच १५ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नीता श्रीवास्तव प्रसाद ह्यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थी घडामोडी प्रमुख डॉ. माधवी वाघमारे ह्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. नीता श्रीवास्तव प्रसाद ह्यांनी Empower her : Celebrating Women Career Advancement ह्या कार्यक्रमाच्या थीम ला धरून महिलांनी आपले करिअर पुढे नेण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या विविध पद्धती आणि पावले याबद्दल माहिती दिली. ठराविक चौकटीत न राहता संपूर्ण ताकदीनिशी आयुष्य जगण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. तसेच महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी  बनवलेल्या 'पॉश' कायद्याबाबत त्यांनी खास माहिती सांगितली.

इन्स्टिट्यूशनस् इनोव्हेशन काऊन्सिलचे अध्यक्ष डॉ. आशिष चौधरी यांनी ह्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे जॉईंट डायरेक्टर श्री. विशाल सावे यांनी सदर कार्यक्रमास आपल्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य डॉ. हरीश वणकुद्रे सरांनी डॉ. नीता श्रीवास्तव प्रसाद ह्याचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले  आणि जागतिक महिला दिनानिमित्त त्याचे अभ्यासपूर्ण विचार मांडले. मोठ्या उत्साहात आणि आनंदाने महिला दिन साजरा करणे ही संस्थेसाठी एक अविस्मरणीय स्मृती होती असे सांगून ह्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

वार्तांकन - प्रा. पंकज शंकर चव्हाण

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून कामगारांना घरगुती भांड्यांचा संच वाटप !!

टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून कामगारांना घरगुती भांड्यांचा संच वाटप !! *कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने...