Monday, 18 March 2024

'मेरी मिट्टी मेरा देश, अभियानातील शिलाफलका वरील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाव उघडेच, निवडणूक आचारसंहिता भंग कि आयोग' गँरटीत दंग ?

''मेरी मिट्टी मेरा देश, अभियानातील शिलाफलका वरील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाव उघडेच, निवडणूक आचारसंहिता भंग कि आयोग' गँरटीत दंग ?

कल्याण, (संजय कांबळे) आझादी का, अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे देशात व राज्यात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद मध्ये मेरी मिट्टी मेरा देश हे अभिमान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, यामध्ये गावातील संस्मरणीय ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करुन त्यावर ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले अशा थोर व्यक्तीची नावे निश्चित करून शिलाफलकाची उभारणी करावी असा हेतू होता. परंतु यावर 'श्री नरेंद्र मोदी, पंतप्रधान, असे लिहिले असून देशात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली असताना ठाणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती हद्दीतील शिलाफलकावरील नाव अद्यापही झाकले नसल्याने श्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्याने त्यांना निवडणूक आचारसंहितेतून वगळले की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर हा आचारसंहितेचा भंग नाही का? की मोदींंच्या गँरटी मध्ये निवडणूक आयोग' दंग, झालाय, असे मिश्कीलपणे बोलले जात आहे.

ग्रामपंचायत व पंचायत राज विभागाने आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर विविध कार्यक्रम हाती घेतले होते. २२ जूलै २०२२ रोजी संपूर्ण राज्यात व देशात 'मेरी मिट्टी मेरा देश, (मिट्टी को नमन विरों  को वंदन) अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रत्येक राज्यात गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम, आणि साक्षरता निर्माण व्हावी, यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, सर्व स्थानिक संस्था यांनी योगदान देणे आवश्यक मानले होते.

यासाठी गावातील, संस्मरणीय ठिकाणी, म्हणजे सरोवर, शाळा,, ग्रामपंचायत, इ.शिलाफलकाची उभारणी करून प्रधानमंत्री यांचा विजन२०४७संदेश, स्थानिक शहिद विरांची नावे, नावे नसल्यास 'मातृभूमीची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या वीरांना शतशः नमन, असे सामान्य वाक्य लिहावे अशा सूचना देण्यात आल्या. 
त्यानुसार देशात, राज्यात असे लाखो शिलाफलकाची निर्मिती करण्यात आली, यासाठी लाखोंचा खर्च हा मनेरगा तून करण्याच्या सूचना दिल्या. मात्र आज यांची अवस्था बेवारस वस्तू सारखी झाली आहे. अशातच आता देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. एकट्या ठाणे जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती आहेत, या शिला फलकावरील श्री नरेंद्र मोदी, पंतप्रधान हे नाव अजूनही तसेच उघडे आहे, शिवाय अनेक सार्वजनिक ठिकाणी, घरांच्या भिंतीवर, अबकी बार मोदी सरकार, असे लिहिलेले तसेच आहे. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग नाही का? मुरबाड तालुक्यातील काही ग्रामसेवक हे हद्दीतील बॅनर, भिंती वरील लिहिलेले तसेच श्री नरेंद्र मोदी, हे नाव झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर तालुक्यात मात्र हे नाव उघडेच आहे, त्यामुळे या परिसरातील निवडणूक आचारसंहिता अमंलबजावणी अधिकारी, हे मोदींच्या गँरटीत दंग झाले की काय? असे मिश्कीलपणे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

१०० दिवसांच्या उपक्रमात अमळनेर प्रांत कार्यालय नाशिक विभागात प्रथम !!

१०० दिवसांच्या उपक्रमात अमळनेर प्रांत कार्यालय नाशिक विभागात प्रथम !! मुंबई (शांताराम गुडेकर) : मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्...