Monday, 18 March 2024

स्वराज्य कोकण कलामंच मुंबई या कलामंचने पुन्हा इतिहास घडवला !!

स्वराज्य कोकण कलामंच मुंबई या कलामंचने पुन्हा इतिहास घडवला !!

*** बाजी प्रभू एक अजिंक्य योद्धा नाट्यकलाकृती रसिक  प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ठरली

मुंबई (शांताराम गुडेकर /दीपक मांडवकर)
 
           मुंबई येथील साहित्य संघ मंदिर येथे स्वराज्य कोकण कलामंच मुंबईचा नमन कार्यक्रम शनिवारी पार पडला. (नांदी नव्या पर्वाची) या ब्रीद वाक्याने कलाक्षेत्रात पर्दापण करणारा  स्वराज्य कोकण कलामंच मुंबई प्रस्तुत स्त्री पात्राने नटलेली कोकणची वैभवशाली लोककला नमन जोपासताना शनिवारी या कार्यक्रमाची सुरवात श्री गणेशाची भक्तीमय आराधना पारंपरिक बाज असणारी नटखट, शृंगारिक गौळण, मावशीबाई, पेंदया, सुदाम आणि बोबडया यांचा विनोदी तडका आणि राधाकृष्ण यांची रासलीला तसेच संगीत सुस्वरांनी मन प्रसन्न करणारी सुप्रसिद्ध शाहीर प्रकाश पांजणे यांची गीतरचना आणि पार्श्वगायन खास आकर्षण शाहीर संदेश ओकटे आणि सौ. मयुरी दणदणे- कांबळे यांचे पार्श्वगायन श्री. शाहीर रवींद्र नाचरे बुवा यांची अनमोल साथ लाभली. 

         तर छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एकनिष्ठ, बलाढ्य लढवय्याची शौर्यगाथा  सांगणारी नाट्यकलाकृती. (बाजीप्रभू" एक अजिंक्य योद्धा...") लेखक/संकल्पना - श्री. राजेश गंगाराम येद्रे, दिग्दर्शक - संदेश महादेव येद्रे, सहदिग्दर्शक श्री संतोष येद्रे, निर्माते मा.श्री दिपक हुमणे आणि श्री कृष्णा येद्रे यांच्या माध्यमातून संपन्न झाला. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला. खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत श्री.संदेश येद्रे आणि माँसाहेब जिजाऊ यांच्या भूमिकेत सोनाली शिंदे आणि बाजीप्रभूंची भूमिका गाजवणारे श्री. प्रशांत गुडेकर आणि शिवा काशिदयांची भूमिका जश्यासतशी करणारे प्रतीक गुडेकर यांच्या अभिनयावर प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप पडली. 

          .स्वराज्य कोकण कलामंच या वर्षीच्या हा पहिला कार्यक्रम असून कोकणची संस्कृती जपणार हा एक नामवंत कलामंच म्हणून ओळखला जातो. शेवटी रंगमंचावर उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांचे आभार मानून रसिक प्रेक्षकांना एक वेगळा आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून  मिळाला. टाळ्यांचा कडकडाट करून कलाकारांच्या कलेला प्रेक्षकांची उत्तम साथ  लाभली आणि पुन्हा एकदा स्वराज्य कोकण कलामंचने नमन कलामंचात इतिहास रचला आणि कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !!

उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !! *४० वर्षांच्या संघर्षाला न्यायालयीन लढ...