Saturday 13 October 2018

मोरेश्वर-आण्णा तरे यांच्या प्रयत्ननांना यश

मोरेश्वर-आण्णा तरे यांच्या पाठपुराव्याला यश

टिटवाळयात पाणी टंचाई होऊ नये यासाठी केली उपाययोजना

टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल)
              टिटवाळा- मांडा शहराची जनसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव-नवीन रहिवाशी सोसायट्या, मोठ-मोठी बारा ते चौदा मजले असलेल्या दहा बारा इमारतींचे कॉम्प्लेक्स येथे तयार होत आहेत. एक कॉम्प्लेक्स म्हणजे जणू काही चारशे-पाचशे रहिवाशांचं एक छोटंसं गाव तयार होतं असं म्हणता येईल. त्यासाठी पाणी, वीज या रोजच्या मूलभूत गरजांची खूप आवश्यकता असते. त्यातल्या त्यात पाणी, हे प्रत्येकाचे जीवन आहे. पाणी नसले तर बहुतेक कामे अडतात.
          पाणी पुरवठा हा, येणाऱ्या दिवसात वेळेवर व मुबलक प्रमाणात व्हावा यासाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव मोरेश्वर-अण्णा तरे यांनी " पाणी अडवा - पाणी साठवा " ही मोहीम सुरू करून काळू नदीवरील पाणी साठा कमी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यांनी कंडोमनपा पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता राजु फाटक यांच्याशी संपर्क साधून, 'पाणी अडवा-पाणी साठवा' या बाबत सतत पाठपुरावा करून, पाणी साठविण्यासाठी काळू नदीच्या धरणावर लोखंडी दरवाजे लावून पाणी अडविण्यासाठी आतापांसुनच सुरुवात केली.
            या वेळी पावसाळ्यात परतीचा पाऊस न आल्याने काळू नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. नदीचे पाणी वाहून जात असल्याने पाण्याची पातळी कमी-,कमी होत आहे ते लक्षात आल्यावर जागृततेने, विलंब न लावता लगेच अधिकाऱ्यांशी अण्णा तरे यांनी संपर्क साधला. येथील संपूर्ण माहिती देऊन येणाऱ्या पाणी टंचाईला टिटवाळा-मांडा येथील नागरिकांना सामोरे जावे लागले असते, तसे होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनीही आण्णा तरे यांच्या निवेदनाची दखल घेत, काळू नदीवरील धरणावर लोखंडी दरवाजे बसवून पाणी अडविले.
            या काळू नदीच्या धरणा जवळच कंडोमनपाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. यातून टिटवाळा-मांडा शहराला पाणी पूरवठा होतो. परंतु काळू नदी ज्या गावांजवळून वाहत येते, तेथील नागरिकही या नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी, प्राण्यांसाठी करीत असतात. मढ, उशीद, फळेगाव, रुंदा, गुरवली येथील नागरिकांना देखील काळू नदीचे पाणी अडविल्यामुळे संभाव्य पाणी टंचाईचा धोका निर्माण होऊ शकत नाही.
            मोरेश्वर-अण्णा तरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव म्हणून कार्यरत असतांना ते टिटवाळा गाव कमिटीचे ही अध्यक्ष आहेत. गाव कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ' पाणी अडवा-पाणी साठवा ' या मोहिमे अंतर्गत आपल्या तत्पर कार्याचा ठसा कायम ठेवला आहे. या मोहिमे साठी नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

1 comment:

  1. Nice work and it's your future view to save water.
    . Burkul sunil ( vasant Moti arcade building no.२ radhangr)

    ReplyDelete

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...