Monday 8 October 2018

टिटवाळयातील पालकांसाठी धक्कादायक बातमी

टिटवाळा येथील के एन टी शाळेने दिली, विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसण्याची शिक्षा

सर्व पालकांसाठी धक्कादायक प्रकार

टिटवाळा (जैनेद्र सैतवाल )
             टिटवाळा शहर हे श्रीक्षेत्र म्हणून महागणपती सिद्धिविनायक गणपती साठी प्रसिद्ध आहे, तसेच ते येथील नागरी संख्या वाढत असल्याने येथे नवं-नवीन शाळां साठी ही प्रसिद्ध होत चालले आहे. टिटवाळयात इंग्लिश मिडीयम, सी बी एस सी बोर्ड, व खाजगी शाळा वाढत आहे. त्यातीलच गणेश मंदिरा जवळील के एन टी पब्लिक स्कूल ही एक शाळा टिटवाळयात प्रसिद्ध आहे. ही शाळा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे शहरातील भरपूर मुले शिकतात.
             आज, के एन टी पब्लिक स्कूल या शाळेत सर्व पालकांना अचंबित करणारा एक धक्कादायक प्रकार येथे घडला. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याना शाळेतील वर्गाबाहेर काढून मुख्याध्यापकांच्या ऑफिस बाहेरील व्हरांड्यात पाच मुलांना बाकावर बसविण्यात आले. जवळपास दीड ते दोन तास या विद्यार्थ्यांना बाहेर बसून राहण्याची शिक्षा दिली. हे जेव्हा पालकांना समजले तेव्हा पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव मोरेश्वर (आण्णा) तरे यांना या विषयीची तक्रार केली. या तक्रारीची लगेच आण्णा तरे यांनी दखल घेत कार्यकर्ते, पालक व पत्रकार यांना सोबत घेऊन के एन टी शाळेत, संस्थेच्या संस्था चालकांची भेट घेतली. व उपरोक्त प्रकाराबाबत जाब विचारला. यावर संस्थाचालक सतीश तिवारी यांनी सांगितले की, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांकडे सहा ते आठ महिन्यांची फी बाकी आहे. म्हणून त्यांना समज देण्यासाठी हे पाऊल उचलले. पण आणा तरे यांनी त्यांचे बोलणे खोडून काढत म्हणाले की, असे कोठे नियम आहेत की पालकांनी फी भरली नाही तर विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवावे? पालकांकडे जर फी बाकी आहे तर ती फी या शिक्षेच्या मार्गाने न घेता पालकांना समजावून सांगून घ्या. त्यावर संस्था चालकांनी विद्यार्थ्यांना वर्गा बाहेर बसवून जी शिक्षा दिली त्याबद्दल माफी मागितली.
           संस्थाचालक सतीश तिवारी यांचे म्हणणे आहे की, बऱ्याच पालकांकडे शाळेची फी बाकी आहे, सहा ते आठ महिन्यांपासून ते पालक फी भरत नाही. वेळो वेळी त्यांना पत्र व फोन करून सूचित केले होते. तरीही फी भरत नाहीत म्हणून आम्ही विद्यार्थ्याना वर्गा बाहेर बसविले. वर्गाबाहेर बसविणे हे चुकीचे असून त्याबद्दल मी माफीही मागतो. पण पालकांनी फी वेळेवर नाही भरली तर शाळेचा खर्च कसा करता येईल? तरी या पुढे सर्व पालकांनी वेळेवर फी भरावी असे ते या वेळी म्हणाले.
            संस्थाचालक सतीश तिवारी यांनी मुलांना शिक्षा दिल्याबद्दल माफी मागितल्या चे सांगून या पुढे फी साठी असा प्रकार केला जाणार नाही अशी ग्वाही मोरेश्वर-आण्णा तरे व उपस्थित कार्यकर्ते, पालक व पत्रकारांना दिली. यावेळी आण्णा तरे यांनी संस्था चालक व पालकांना समजावून हे प्रकरण मिटविले. की यापुढे असे विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचे प्रकार होणार नाहीत.
            याप्रसंगी मोरेश्वर-आण्णा तरे यांच्या सोबत समीर भालके, मोहन तरे, संतोष कराळे, किरण रोठे, विष्णू वाघे, अशोक चौरे, कैलास एगडे, पत्रकार मित्र व पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित होते.
           

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...