Saturday, 6 October 2018

मुरबाड शहरातील धक्का दायक घटना

मुरबाड शहरातील धक्का दायक घटना

शहरातील सौ. निर्मला बळीराम तोंडलीकर विद्यालयात दुसरीच्या विद्यार्थ्यास अमानुष मारहाण

मुरबाड - (मंगल डोंगरे)
            मुरबाड शहरातील सौ.निर्मला बळीराम तोंडलीकर विद्यालयात इ.२ रीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यास  जबर मारहाण करून शौचालयात डांबून ठेवण्यात आले.
          सदर विद्यार्थ्याचे नाव सार्थक उमेश हुमणे असे आहे. शिक्षिका सौ.सुचिता रविंद्र पाटील यांनी त्यास गृहपाठ केला नाही म्हणून जबर मारहाण करून शौचालयात डांबून ठेवले.
            एक तासानंतर मित्रांनी त्याची  शौचालयातून सुटका केली. सदर प्रकाराबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारला असता त्यांनी ही आमची जबाबदारी नाही असे सांगितले.
          त्यामुळे सदर विद्यार्थ्याच्या पालकांनी मुरबाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर गुन्ह्यात पोलिसांनी कलम ३२३ अंतर्गत सदर शिक्षिका सौ.सुचिता रविंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment

श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा !!

श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :              श्री का...