Friday 25 December 2020

अनाधिकृत बांधकाम विरोधात कल्याण वनविभागाची धडक कारवाई, कचोरे येथील बांधकामे निष्कासित !

अनाधिकृत बांधकाम विरोधात कल्याण वनविभागाची धडक कारवाई, कचोरे येथील बांधकामे निष्कासित !


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण वनपरिक्षेत्रातील मौजे कचोरे येथील संरक्षित वन सर्व्हे नं ३८ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. कच्च्या झोपडय़ा बांधकाम झाले असल्याचे कल्याण वनविभागाचे लक्षात आल्यानंतर ठाण्याचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे आणि सहा वनसंरक्षक श्रीमती गिरिजा देसाई ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्पना वाघिरे यांनी या बांधकामावर कारवाई करित ही बांधकामे निष्कासित केली.


कल्याण वनपरिक्षेत्रातील मौजे कचोरे येथे संरक्षित वन सर्व्हे नं ३८ वर मोठ्या प्रमाणात झोपडय़ा व बांधकाम होत असल्याची बाब वनविभागाचे लक्षात आली होती. कल्याण आणि डोंबिवली शहराच्या मध्यभागी कचोरे हे गाव असल्याने येथील जागेला सोन्याचा भाव आला आहे. येथेच वनविभागाचे संरक्षित क्षेत्र आहे. या जागेवर झोपडय़ा व बांधकाम होत असल्याचे. वन विभागाच्या निदर्शनास आले होते त्यामुळे ठाण्याचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे आणि सहा वनसंरक्षक श्रीमती गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्पना वाघिरे यांनी मच्छिंद्र जाधव, कल्याण वनपाल, रोहित भोई, राजू शिंदे,. वनपाल खडवली रघूनाथ शेलार, रामदास गोरले, दौलत मोरे, दिलीप भोईर, आदीनी ही मोहीम राबविण्यात मदम केली. यावेळी १५० कच्या व पक्के बांधकाम केलेल्या झोपड्या पाडल्या.
सदरील मोहिम ही संयुक्त मोहीम असल्याने कल्याण वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल /वनरक्षक संजय धारवणे,. वनपरिक्षेत्र अधिकारी पडघा एस ऐ आर्डेकर, व स्टाप, भिवंडी, मुरबाड, बदलापूर, ठाणे वनपरिक्षेत्रातील स्टाप राज्य राखीव पोलीस दलाचे श्री मोरे, सहा पोलीस आयुक्त ए एस धुरी, टिळक नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही एस कडलक, सहा पोलीस निरीक्षक मांडगे, पोलीस हवालदार एस पी खाडे, पोलीस शिपाई व इतर अधिकारी व कर्मचारी, कल्याण डोंबिवली महानगर पालिका अधिकारी व कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, रुक्मिणीबीई रुग्णालयातचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांनी ही मोहीम पार पाडली.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...