Thursday 24 December 2020

बी एस एन एल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी कडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ !

बी एस एन एल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी कडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ !


"स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून पश्चाताप करण्याची आली कर्मचाऱ्यावर वेळ"

कल्याण : बीएसएनएल एम्प्लॉईज ज्यु.क्रेडिट सोसायटी कडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्याचे पैसे मिळण्यास विलंब होत असून ११ महिने उलटूनही अद्याप पैसे मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
केंद्र सरकारने बीएसएनएल कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची घोषणा करून 98 हजार कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त केले होते. या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्याची खात्री देण्यात आली होती परंतु बीएसएनएल एम्प्लॉईज जु. क्रेडिट सोसायटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यास विलंब होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
रावसाहेब भालेराव यांनी 11 महिन्यांपूर्वी स्वच्छ निवृत्ती स्वीकारली होती. अकरा महिने उलटूनही अनेकदा सोसायटीकडे अर्ज करून सुद्धा रावसाहेब भालेराव या कर्मचार्‍यास हक्काचे पैसे मिळाले नाहीत. रावसाहेब भालेराव हे बीएसएनएल ज्यू. क्रेडिट सोसायटीचे सभासद आहेत. त्यांचे सोसायटीकडे दीड लाख रुपये येणे बाकी आहे. निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी क्रेडिट सोसायटी कडे पैसे मिळण्यासाठी अर्ज दाखल केला अनेक वेळा त्यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहार करून पैसे मिळण्याची विनंती केली परंतु त्यांना अद्यापही हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. सोसायटीकडे त्यांनी चौकशी केली असता तुम्ही भालचंद्र झागस यांना कर्जासाठी साक्षीदार आहात त्यांचा मृत्यू झाला असल्याकारणाने तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर क्रेडिट सोसायटी वर प्रशासक नियुक्त झाल्याने तुमचे पैसे मिळण्यास उशीर होत असल्याचे लिपिक मोरे यांनी सांगितले. सोसायटीच्या ठरावानुसार सोसायटी कडून कर्ज घेतलेल्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याचे कर्जे माफ करण्यात येते. मी साक्षीदार असलेल्या भालचंद्र झागस यांना त्यांचे सर्व पैसे मिळाले असून त्यांना पेंशन सुरू झाली आहे तरीही सोसायटीने माझे पैसे जाणून-बुजून थांबवले आहे असा स्पष्ट आरोप रावसाहेब भालेराव यांनी केला आहे. गेल्या अकरा महिन्यांपासून सोसायटीने पैसे थांबविल्याने भालेराव यांचे मानसिक संतुलन बिघडले असून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे कामही गेले आणि हक्काचे पैसेही मिळाले नाहीत त्यामुळे त्यांचे अतिशय नुकसान झाले असून यास क्रेडिट सोसायटी जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत बीएसएनएल एम्प्लॉईज जुनिअर क्रेडिट सोसायटीचे लिपिक मोरे यांना विचारले असता भालेराव यांचे पैसे देण्यात कोणतीही अडचण नाही परंतु क्रेडिट सोसायटीच्या निवडणूका जवळ आलेल्या आहेत सध्याच्या कोरोना काळामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात येऊन सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे. प्रशासकांनी भालेराव यांचे प्रकरण स्थगित केले असून निवडणुका लवकरच जाहीर होऊन नवीन कार्यकारी मंडळाने सूत्रे हाती घेतल्यानंतर भालेराव यांचे पैसे तात्काळ देण्यात येतील असे लिपिक मोरे यांनी सांगितले.
क्रेडिट सोसायटीच्या सर्व सभासदांनी बहुमताने ठराव मंजूर केलेला असताना नियुक्तीवर आलेले प्रशासक सभासदांचे पैसे कसे काय रोखू शकतात. सोसायटीच्या सभासदांनी केलेला ठराव हा नियमबाह्य पद्धतीने केला होता का ? तसेच चिरीमिरी दिल्यास काम लवकर होते असा खडा सवाल भालेराव यांनी उपस्थित केला आहे. माझ्या हक्काचे पैसे मला न मिळाल्यास माझ्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून स्वेच्छा निवृत्ती घेऊन पश्चाताप होत असल्याचे भालेराव यांनी सांगितले.
स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्यास भाग पाडणाऱ्या सरकारने कर्मचाऱ्यांना पैसे मिळण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे निवडणुकीमुळे कर्मचाऱ्यांचे रखडलेले पैसे देण्याची जबाबदारी सरकारची असून याकडे सरकारने लक्ष घालून कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...