Tuesday 29 December 2020

स्वराज्याच्या ऐतिहासिक भूमितील दुर्लक्षित राहिलेल्या शाहिर पोपटराव वाघमारे यांना एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस चा आधार!

स्वराज्याच्या ऐतिहासिक भूमितील दुर्लक्षित राहिलेल्या शाहिर पोपटराव वाघमारे यांना एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस चा आधार!
कल्याण (संजय कांबळे) : रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १लाख ५ हजारांचे घोडदळ, ३० मातब्बर सरदार, ३६ समशेरबहाद्दर योध्दे, १२ हत्तीची गजसेना अशा सेना सागराचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची जन्मभूमी असलेल्या कराड तालुक्यातील तळबीड या ऐतिहासिक भूमिती जन्म घेऊन गेली ४०/५० वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या शाहिर पोपटराव वाघमारे यांच्या "शब्दरचनेची" दखल कल्याण मुंबई येथील एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेने घेतली असून त्यांची काही मराठी गाणी रेकॉर्डिंग व विडिओ शुट करण्याचा निर्णय घेतला आहे.


मराठ्यांच्या इतिहासात हंबीरराव मोहिते यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी शिवाजी महाराज व संभाजी महाराज या दोघांच्या कारकिर्दीमध्ये फार महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रंणागण हेच त्यांचे विश्रांतीस्थान होते. आपल्या तळपत्या तलवारीचे पाणी त्यांनी मुघलांना पाजले होते. छ शिवाजी राजे व छ संभाजी राजे या दोघांनाही त्यांच्या हस्ते राज्याभिषेक झाला. सप्तसागर व सप्तसिंधूच्या पावन जलांनी त्यांनी आपल्या हाताने राज्यांच्या मस्तकावर अभिषेक केला असा असामान्य सेनापती पुन्हा होणे, असा सरसेनापती कराड जवळील वंसत गडाच्या पायथ्याशी तळबीड या गावात जन्माला आले हे स्वराज्याचे भाग्यच म्हणावे लागेल. परंतु काळानुरूप बदल झाला. असला तरी तळबीड चे माझी सरपंच जयतरांव नाना मोहिते यांनी गावाची प्रगती व सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे सुशोभीकरण, आकर्षक बागबगीचा तयार करने यासाठी मा विजयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार्य केले. बारा बलुतेदार येथे गुण्यागोविंदाने राहत असले तरी याच ऐतिहासिक भूमितील मागासवर्गीय समाजात जन्म घेतलेले शाहिर पोपटराव वाघमारे हे मात्र प्रसिद्धी पासून कोसो दुर राहिले पर्यायाने त्यांनी लिहिलेल्या सुमारे १ हजारच्या आसपास देशभक्ती, समाजप्रबोधन, विडंबन, तसेच अभिमानाने धाती, ऊर भरून येणारे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक पोवाडे आज रेकॉर्डिंग अभावी लोकांसमोर आले नाही व पोपटराव पवार यांच्या शब्द रचनेच्या वह्या धुळखात पडल्या आहेत. तर काही वह्यांना वाळवी लागली आहे. 
ही खबर एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेच्या सातारा जिल्ह्यातील टिम ला लागली. त्यांनी टिम प्रमुख संजय कांबळे यांच्या कानावर घातली. त्यांनी वेळ न दवडता तळबीड या सरसेनापतीच्या गावाला भेट दिली यावेळी त्याच्या समवेत सातारा जिल्हा प्रमुख नामदेवराव बल्लाळ, गीतकार शिवाजी पवार, माजी मुख्याध्यापक एस जे कांबळे, मोहसीन जमादार, रोहित सकटे, सुरेश वाडकर आदी होते. . गावात प्रवेश करताच प्रथम स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन शाहिर पोपटराव वाघमारे यांच्या घरचा रस्ता धरला. 
 साधारण पणे ८०/९० वर्षाचे शरीराने थकलेले परंतु मनाने १७/१८ वर्षे वयाच्या तरुणांना लाजवेल असे शाहिर समोर आले. 'माझ्या प्रिय भारत माते, पंढरीनाथ आलो तूझ्या दारी, तूझ्या दर्शनासाठी झालो वारकरी'! महाराष्ट्राच्या पावित्र्याला कुणाच्या लागू नये नजरा, तयाला मानाचा मुजरा! अशा एक एक गाण्याच्या ओळी शाहिर ऐकवत होते. आणि उपस्थित सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करीत होते.
मग पोपटराव वाघमारे बोलू लागले. जेमतेम ४थी पर्यंत शिक्षण झाले. घरची परिस्थिती बिकट, जगणे मुश्किल झाले असताना काका सुदाम यांनी मुंबई ला आणले. मोलमजुरी करित असतानाच वेस्टन रेल्वेत काम लागले. पण तीन वर्षांत काम गेले. गावी पत्नी, आई वडील, मुले याचे पोट कसे भरायचे हे मोठे कोडे होते. नंतर मुंबईत श्रीराम मिल मध्ये काम मिळाले. बदली कामगार म्हणून, पण तेहि सुटले. त्यामुळे जगणे मुश्किल झाले. आता काय करायचं हे कळेना. आणि अशातच पोपटराव तमाशा कडे वळले. ३०० रुपये पगारावर त्यांनी तमाशात नोकरी पत्करली. तमाशा साम्राज्ञी. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विठाबाई मांग, नारायणगावकर, काळू बाळू, मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, अशा नामांकित तमाशामधून काम करताना पोपटराव यांच्यातील शाहिर जागा झाला. १९४१ रोजी जन्मलेले पोपटराव पहिल्यापासूनच तल्लक बुध्दी चे होते. त्यामुळे आपसूकच त्यांची लेखनी शब्दरुपाने कागदावर उमटू लागली. आणि बघता बघता आज त्यांची १हजाराच्या आसपास गाणी लिहून तयार आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील पोवाडे, देशभक्तीपर गीत, महाराष्ट्राचे अभिमानास्पद गाणे, समाजप्रबोधन, विडंबन, विनोदी, भक्ती गिते, असे हजारो गाणे त्यांनी टिमचे प्रमुख संजय कांबळे यांना दाखवली. त्यांनी ताबडतोब आपल्या एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या बॅनर खाली शाहिर पोपटराव वाघमारे यांची काही गाणी नामांकित पार्श्वगायिकाकडून गाऊन ती रेकॉर्डिंग व विडिओ शुट करण्याचे अश्वासन दिले. ऐवढेच नव्हे तर टिमच्या सदस्यांनी दुर्लक्षित शाहिर पोपटराव वाघमारे यांच्या घरी जाऊन काही गाण्यांचा करारनामा केला आहे. यावेळी सातारा जिल्हा टिमचे प्रमुख नामदेव बल्लाळ, मोहसीन जमादार, सुरेश वाडकर, रोहित सकटे, आदी उपस्थित होते. त्यामुळे अडचणी च्या काळात एस के फिल्म प्रोडक्शन ने आधार व साथ दिल्याने शाहिर पोपटराव वाघमारे, त्यांचा मुलगा दयानंद वाघमारे यांनी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या चे संजय कांबळे व टिमचे आभार मानले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्य दलाचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जन्मभूमीत ऐतिहासिक शाहिर असलेल्या पोपटराव वाघमारे यांची होणारी परवड योग्य नाही. त्यामुळे त्यांचा ऐतिहासिक ठेवा नव्या पिढीला माहित होण्यासाठी तो लोकांसमोर यायला हवा, तसा सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवा असे मत व्यक्त केले. 

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...