Tuesday 29 December 2020

कल्याण तालुक्यातील ऐकवीस ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी तब्बल तीनशेचाळीस उमेदवारी अर्ज, बेहरे ग्रामपंचायतीत सर्वाधिक?

कल्याण तालुक्यातील ऐकवीस ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी तब्बल तीनशेचाळीस उमेदवारी अर्ज, बेहरे ग्रामपंचायतीत सर्वाधिक?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य पदासाठी तब्बल ३४० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आजच्या दत्तजयंतीच्या दिवशीच्या मुहूर्तावर उमेदवारीचा पाऊस पडला. तालुक्यातील सर्वाधिक उमेदवारी अर्ज बेहरे ग्रामपंचायतीमधून दाखल झाल्याने बिनविरोध निवडणुकीचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आणि पहिल्या दिवशी एकाही उमेदवारांनी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे तालुक्यात सर्व ग्रामपंचायती या बिनविरोध होणार अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी तब्बल १२ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. यांनतर तिसऱ्या दिवशी ८४ आणि आज म्हणजे दत्त जयंती निमित्त तब्बल ३४० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. तालुक्यात रायते, गोवेली, बेहरे, राया ओझर्ली, घोटसई, मानवली, वरप, कांबा, म्हसकळ, नडगाव दांणबाव, सांगोडा कोंढेरी, वाकळण, शिरडोण, जांभूळ, बापसई, आपटी, गुरवली, खोणी, आणे भिसोळ या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
एकूण ७४ प्रभागासाठी २११सदस्या करिता सुमारे ३१ हजार १४७ पुरुष आणि २७ हजार १३७ महिला मतदार मतदान करणार असून आज २५६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यापैकी सर्वाधिक उमेदवारी अर्ज बेहरे या १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ४३ उमेदवारी अर्ज  भरले तर सर्वातकमी वडवली शिरडोण या ग्रामपंचायतीच्या मधून दाखल केले ते ५ आहेत. या खालोखाल आणे भिसोळ ६, रायते पिंपळोली १४,खोणी वडवली २५, म्हारळ ३१, गोवेली. रेवती १२, उतणे चिंचवली ११,मानिवली ७,निंबवली मोस १०, गुरवली ११, वरप १७, आपटी मांजर्ली ८, सांगेडा कोंढेरी १५, नवगाव बापसई ११, जांभूळ वसत १२, म्हसकळ अनखर ७, नडगाव दांणबाव २४, राया ओझर्ली ३०, कांबा २६, घोटसई १५ अशी वर्गवारी आहे.
अजून एक दिवस बाकी आहे. म्हणजे ३० डिसेंबर पर्यंत उमेदवार अर्ज भरता येणार आहेत अशीच परिस्थिती राहिली तर ही आकडेवारी ३४० वरून ४०० किंवा ५०० पर्यंत जावू शकते.
परंतु मध्यंतरी कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायती या बिनविरोध करायच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तसे अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत होते. पण एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग पाहता बिनविरोध ग्रामपंचायती ही कल्पना मागे पडू शकते असे वाटते. याला कोण जबाबदार याचाही विचार व्हायला हवा!

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...